Live Update : एकूण 241 भारतीय प्रवाशांसह युक्रेनहून दिल्लीला रवाना होणार एअर इंडियाचं विशेष विमान

Live Update : एकूण 241 भारतीय प्रवाशांसह युक्रेनहून दिल्लीला रवाना होणार एअर इंडियाचं विशेष विमान
एकूण 241 भारतीय प्रवाशांसह युक्रेनहून दिल्लीला रवाना होणार एअर इंडियाच्या विशेष विमान हे विमान आज रात्री 10.15 वाजता लाँड होणार होते मात्र उशीरा म्हणजे 11.30 वाजता हे विमान लाँड होणार असल्याचे सांगितले जात आहे.
सुमारे 250 भारतीय आणि विविध राज्यांतील विद्यार्थी आज रात्री युक्रेनमधून दिल्लीला परतत आहेत. भारतीयांना परत येण्यास मदत करण्यासाठी येत्या काही दिवसांत आणखी उड्डाणे सुरु केली जातील अशी माहिती राज्यमंत्री एमईए व्ही. मुरलीधरन यांनी दिली आहे.
समीर वानखेडेंना अटकेपासून संरक्षण मिळाले तरी चौकशीसाठी ठाण्यातील कोपरी पोलिस स्थानकात हजर राहावे लागणार
मुंबईत लोकल प्रवासासहित इतर निर्बंध अद्याप कायम- राज्य सरकार कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करा, राज्य सरकारचं आवाहन पुढच्या तीन दिवसात सुधारित नियमावली जाहीर करणार, राज्य सरकारची कोर्टात माहिती लसीकरण न झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासासहित इतर निर्बंध कायम- राज्य सरकार
मुंबईत आज 135 नवे कोरोनाबाधित रुग्ण; तर 233 रुग्ण कोरोनामुक्त
मध्य प्रदेश सरकारने कोरोनासंबंधीत सर्व निर्बंध हटवले
एसटी विलीनीकरणाबाबतची पुढील सुनावणी शुक्रवारी होणार विलीनीकरणाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, राज्य सरकारच्या वकिलांची कोर्टाला माहिती
हिमाचल प्रदेशच्या ऊना जिल्ह्यातील टाहलीवालमध्ये एका फटाक्याच्या फॅक्ट्रीमध्ये ब्लास्ट झाला. या भीषण ब्लास्टमध्ये ६ महिलांचा मृत्यू झाला असून १२हून अधिक जखमी झाले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध सुरू असलेला तपास ९ मार्चपर्यंत रोखण्यास सांगितले आहे. सीबीआयकडे तपास देण्याबाबत ९ मार्च रोजी अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
एसटी विलिनीकरणाबाबत आज दुपारी अडीच वाजता हायकोर्टात सुनावणी
सेन्सेक्स ८८५ अंकांनी घसरून ५६,७९८ झाले आहे. तर निफ्टी २५५ अंकांनी घसरून १६,९४९वर आहे.
कर्नाटकात बजरंग दलच्या कार्यकर्त्याची हत्या केल्याप्रकरणी ३ ते ४ जणांना केली अटक
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशातील इम्फाळ, मणिपूर आणि बहराइचमध्ये निवडणूक रॅलींना संबोधित करणार आहेत.
एसटी संपाबाबत आज हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. राज्य सरकारने विलीनीकरणासंदर्भातील अहवाल हायकोर्टाकडे सुपूर्द केला आहे. यावरती आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना ठाणे पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. चौकशीसाठी २३ फेब्रुवारीला पोलीस ठाण्यात सकाळी ११ वाजता हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे परवाना प्राप्त करण्यासाठी वयासंदर्भातील माहिती योग्य न दिल्याचा आरोप चौकशीच्या नोटीशीत करण्यात आला आहे.  
First Published on: February 22, 2022 10:07 PM
Exit mobile version