Live Update: राज्यात आज दिवसभरात ३१ नवे ओमिक्रॉनबाधित आढळले

Live Update: राज्यात आज दिवसभरात ३१ नवे ओमिक्रॉनबाधित आढळले

Live update Mumbai Maharashtra

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना कोरोनाची लागण
आज राज्यात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत तब्बल ११ हजारांनी अशी मोठी घट झाली. राज्यात आज ३३ हजार ४७० नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २९ हजार ६७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात २ लाख ६ हजार ४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सविस्तर वाचा 
गेल्या २४ तासांत मुंबईत १३ हजार ६४८ रुग्ण कोरोनाबाधित आढळले असून ५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर २७ हजार २१४ रुग्ण रिकव्हर होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे मुंबईतील आजच्या कोरोना आकडेवारीने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. सविस्तर वाचा 
कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना कोरोनाची लागण
केंद्रीय मंत्री अजय भट्ट यांना कोरोनाची लागण
बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
मुंबईतील धारावीमध्ये आज दिवसभरात ९७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. सध्या धारावीत ९४३ कोरोनाबाधित सक्रिय रुग्ण आहेत.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उद्या संध्याकाळी ४ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण झाली आहे.
कोस्टल रोड प्रकरणातील महत्त्वाचा २ किमी बोगद्याचे वर्षभरात काम पूर्ण प्रियदर्शिनी पार्क ते गिरगाव चौपाटी बोगद्याचे खणन मावळा टीबीएम संयंत्रणाची मोठी कामगिरी
नेपाळमधील शाळा जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत बंद राहणार असे शिक्षण मंत्रालयाने सांगितले आहे.
कामगारांनी अंत न पाहता एसटी बस सुरु करावी, पगार वाढीबाबत कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम- अनिल परब एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांची मोठी गैररसोय, महाराष्ट्रातील प्रवासी वर्ग अत्यंत महत्वाचा, एसची संपामुळे मागील दोन महिन्यांपासून प्रवाशांचे खूप हाल झाले, एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीसोबत सकारात्मक चर्चा झाली, एसटी सेवा सुरु झाली पाहिजे यावर एकमत, प्रवाशांसोबत असलेली बांधिलकी लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांनी कामावर यावे, सरकारवर विश्वास ठेवा, एसटी सेवा पूर्वपदावर आणा, विलिनीकरणाचा मुद्दा न्याप्रविष्ठ आहे- शरद पवार एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचे शरद पवार यांचे आवाहन
एसटी महामंडळाच्या विलिनीकरणावर कोर्ट जो निर्णय देऊन तो मान्य असेल- एसटी कृती समिती
राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी घेतला कोरोनाविरोधी लसीचा बुस्टर डोस
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, एअर इंडियाच्या विमानाला पुशबॅक करणाऱ्या गाडीला आग
शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी महत्त्वाची बैठक
पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंना कोरोनाची लागण


उत्तर प्रदेशात रुग्णांची नोंदणी होत नाही, कुणालातरी निवडणुका आटोपण्याची घाई झाली आहे, गोव्यात स्वबळावर सत्ता आणण्यासाठी काँग्रसचे प्रयत्न- संजय राऊत
देशात आज कोरोनाचे 1 लाख 79 हजार 723 नवे रुग्ण, 146 रुग्णांचा मृत्यू भायखळा येथील मुस्तफा बाग परिसरातील लाकडाच्या गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल

सुप्रीम कोर्टात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीबाबत सुनावणी होणार आहे.


महाराष्ट्र विधिमंडळातील निलंबीत 12 भाजप आमदारांबाबत येत्या 11 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
First Published on: January 10, 2022 10:55 PM
Exit mobile version