कोरोनातून रिकव्हर झालेले रुग्ण फंगल इंफेक्शनचे शिकार, काहींची गेली दृष्टी

कोरोनातून रिकव्हर झालेले रुग्ण फंगल इंफेक्शनचे शिकार, काहींची गेली दृष्टी

कोरोनातून रिकव्हर झालेले रुग्ण फंगल इंफेक्शनचे शिकार, काहींची गेली दृष्टी

देशात एका बाजूला कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असून रुग्ण रिकव्हर होण्याचे प्रमाण वाढत आहे. पण दुसऱ्या बाजूला रिकव्हर होणारे रुग्णांना फंगल इंफेक्शन होऊन दृष्टी जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयातील डॉक्टरांनी दावा केला आहे की, ‘कोरोना व्हायरसमधून रिकव्हर झालेल्या लोकांमध्ये दुर्मिळ आणि जीवघेणे फंगल इंफेक्शन आढळले आहेत. ज्यामुळे त्यामधील जवळपास अर्ध्या लोकांची दृष्टी गेली आहे.’ सोमवारी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत दावा केला आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, ‘गेल्या १५ दिवसांत कान-नाक-घसा (ईएनटी) डॉक्टरांच्या समोर अशाप्रकारची १३ प्रकरणे समोर आली आहेत.’ अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘ही चिंताजनक समस्या दुर्मिळ आहे, पण नवीन नाही. कोरोनापासून होणारे फंगल इंफेक्शन यामध्ये नवीन काही नाही आहे.’

गेल्या १५ दिवसांत १३ प्रकरणे ईएनटी डॉक्टरांसमोर आले आहेत, ज्यामधील ५० टक्के प्रकरणांमध्ये रुग्णांची दृष्टी गेली आहे, असे रुग्णालयाने निवेदनात म्हटले आहे. दरम्यान आज (मंगळवार) देशात २२ हजार ६५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ३५४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ९९ लाख ६ हजार १६५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४३ हजार ७०९ मृत्यू झाले आहेत. तसेच आज ३४ हजार ४७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ९४ लाख २२ हजार ६३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – कोरोनानंतर जपानमध्ये आणखी एका महामारीचा हाहाकार, पक्ष्यांना ठार मारून गाडण्याचे आदेश


 

First Published on: December 15, 2020 9:35 PM
Exit mobile version