Live Update: एकनाथ खडसेंची प्रकृती खालावल्याने पत्रकार परिषद रद्द

Live Update: एकनाथ खडसेंची प्रकृती खालावल्याने पत्रकार परिषद रद्द

Live update Mumbai Maharashtra

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे ईडीच्या चौकशीसाठी हजर राहण्यापुर्वी पत्रकार परिषद घेणार होते परंतु त्यांची प्रकृती खालावली असल्यामुळे पुर्वनियोजित पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे.  
देशाचे आरोग्यमंत्री म्हणून मनसुख मांडवीयांना नियुक्त करण्यात आले आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सहकार खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ( सविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा) नारायण राणे यांच्याकडे लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे खाते स्मृती इराणी यांना महिला आणि बाल कल्याण विकास मंत्री पदाची जबाबदारी अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे मंत्रालय आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रीपदाची जबाबदारी पीयूष गोयल यांच्याकडे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाची जबाबदारी धर्मेंद्र प्रदान केंद्रीय शिक्षणमंत्री हरदिपसिंग पुरी यांच्याकडे शहरी विकास आणि पेट्रोलियम मंत्रालयाची जबाबदारी ज्योतिरादित्य शिंदे वाहतूक मंत्री पंतप्रधान मोदींकडे विज्ञान तंत्रज्ञान खात्याची जबाबदारी पुरुषोत्तम रुपालांकडे दूध आणि मत्स्य मंत्रालय डॉ. मुंजपारा महेंद्रभाई यांच्याकडे महिला बालकल्याण राज्यमंत्रीपदाची जबाबदारी पियुष गोयल यांचे रेल्वेमंत्री पद काडून वस्त्रोद्योग मंत्रालयाची जबाबदारी
पंतप्रधान मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. एकूण ४३ मंत्र्यांची केंद्रीय मंत्रिपदाची शपथविधी पुर्ण झाली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर पहिलीच केंद्रीय मंत्रिमंडळ बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे.
Mumbai Corona Update : मुंबईत मागील २४ तासात ६६४ कोरोनाबाधितांची नोंद, ९ कोरोनाबाधितांचा मृत्यू ७ जुलै, संध्या. ६:०० वाजता २४ तासात बाधित रुग्ण – ६६४ २४ तासात बरे झालेले रुग्ण – ७४४ बरे झालेले एकूण रुग्ण – ७००५६७ बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९६% एकूण सक्रिय रुग्ण- ७८१६ दुप्पटीचा दर- ८४४ दिवस कोविड वाढीचा दर ( ३० जून ते ०६ जुलै)- ०.०८ %
मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळेस ते म्हणाले की, ‘पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असून मंत्रीपद दिल्याबद्दल मोदी, शहा आणि जेपी नड्डा यांचे आभार. ‘ पुढे काय म्हणाले नारायण राणे?
डॉ. भारती पवार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली
डॉ. भागवत कराड, सुभाष सरकार, राजकुमार सिंग यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना उद्या सकाळी ११ वाजता हजरा राहायला सांगितले आहे. तसेच त्यांचा जावई गिरीश चौधरीला १२ जुलैपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे.
कपिल पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली
नारायण राणे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली
राष्ट्रपती रामनाथ कोविंद राष्ट्रपती भवनात दाखल झाले आहेत.
राष्ट्रपती भवनात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथ विधी सोहळ्याला सुरुवात झाली आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच यांच्यासोबत माहिती कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राजीनामा दिला आहे.
बिश्नुपुरचे भाजप खासदार सौमित्र खान यांनी पश्चिम बंगालच्या बीजेवायएम अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
४३ नव्या मंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे. या यादीमध्ये पहिलेच नाव नारायण राणे यांचे आहे. महाराष्ट्रातून चार जणांना मंत्रिपद देण्यात आले आहे. नारायण राणे यांच्यासह कपिल पाटील, भारती पवार, भगवान कराडांना मंत्रिपद देण्यात आले आहे. सविस्तर वाचा 
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे कुटुंबिय आणि मित्रमंडळी त्यांच्या अंत्यदर्शनापूर्वी निवासस्थानी जमले आहेत. आज सायंकाळी पाचव वाजता मुंबईच्या सांताक्रूझ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा
गिरीश चौधरी यांना ५ दिवसांची ईडी कोठडी , एकनाथ खडसे यांचे जावई आहोत गिरीष चौधरी, पुण्यातील जमीन घोटाळ्याप्रकरणी १२ जूलैपर्यंत ईडी कोठडी,
संजय धोत्रे आणि रावसाहेब दानवे यांचे राजीनामे
केंद्रीय मंत्रिमंडळा विस्ताराआधी चार मंत्र्यांचा राजीनामा, सदानंद गौडा, देबोश्री चौधरी, केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल, कामगार मंत्री संतोष गंगवार
कृपाशंकर सिंह यांचा आज भाजपामध्ये प्रवेश, भाजपाच्या प्रवेश कार्यक्रमाला सुरुवात, या बैठकीत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते उपस्थित
ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांच्या पार्थिवाचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंत्यदर्शन घेतले व कुटुंबियांचे सांत्वन केले. आज सकाळी दिलीपकुमार यांचे निधन झाल्याचे वृत्त समजल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शोकभावना व्यक्त केली तसेच त्यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. मुख्यमंत्र्यांनी दिलीपकुमार राहत असलेल्या खार येथील निवासस्थानी जाऊन पार्थिवाचे अंत्यदर्शनही घेतले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर त्यांच्यासमवेत उपस्थित होते.
नारायण राणे, कपिल पाटील पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल, भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा, भागवत कराड, मिनाशी लेखी, पशुपती पारस, हिना गावित, ज्योतिराधित्य सिंधिया अनुप्रिया पटेल
मनसेचे आमदार राजू पाटील ईडीच्या कार्यालयात दाखल, ईडी ऑफिसमध्ये राजू पाटील यांच्याचे कारण अद्याप अस्पष्ट

मुंबईच्या सांताक्रूझमध्ये सायंकाळी 5 वाजता दिलीपकुमार यांच्यावर अंत्यसंस्कार होणार


आज केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्ताराची शक्यता, थोड्यावेळात पंतप्रधान निवासस्थानी सुरु होईल बैठक

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सर्वप्रथम वाहिली श्रद्धांजली


गृहमंत्री अमित शाहांकडून दिलीपकुमारांचे स्मरण


सांस्कृतिक विश्वाचे मोठं नुकसान – पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाने एक महानायक गमावला – शरद पवार
पी. आर. कुमारमंगलम यांच्या पत्नीची हत्या, ६७ वर्षीय किटी मंगलम यांची उशीने तोंड दाबून हत्या करण्यात आली, घरातील धोबी २ साथीदारांनी हत्या केल्याचा आरोप , हत्येप्रकरणी २ आरोपींना पोलिसांकडून अटक
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार पार्थिव त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येत आहे.
एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने केली अटक, १३ तासांच्या चौकशीनंतर केली अटक
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन, आज सकाळी ७.३० वाजता हिंदुजा रुग्णालात घेतला अखेरचा श्वास, ९८ वर्षीय दिलीप कुमार यांच्यावर गेल्या दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते. ( वाचा सविस्तर )
नरेंद्र मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज म्हणजे बुधवारी संध्याकाळी ६ वाजता पार पडणार आहे. या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर हे भारताच्या इतिहासातील सर्वात तरुण मंत्रिमंडळ असेल. कारण या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक तरुण चेहऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे, यामुळे मंत्रिमंडळाचे सरासरी वय खूपच कमी होईल, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे.
 
First Published on: July 7, 2021 11:43 PM
Exit mobile version