Modi Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराची नावं जाहीर, राणेंना मंत्रीपद, अधिकृत यादी एका क्लिकवर

PM Narendra Modi Cabinet
मंत्रिमंडळ विस्ताराची नावं जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमडळाचा विस्तार आज संध्याकाळी सहा वाजता होणार आहे. त्याआधी केंद्र सरकारने मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या ४३ नेत्यांची यादी जाहीर केली. महाराष्ट्रातून नारायण राणे, भागवत कराड, भारती पवार आणि कपिल पाटील हे चार नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

केंद्रामध्ये राज्यातील नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर, रामदास आठवले, रावसाहेब दानवे, संजय धोत्रे हे आधीपासून मंत्री होते. संजय धोत्रे यांनी मंत्रीपदाचा राजानामा दिल्याने आणि आता नव्याने चार मंत्री झाल्यामुळं राज्यात नऊ केंद्रीय मंत्री असणार आहेत. दरम्यान आज ३६ नवे मंत्री शपथ घेणार असून ७ राज्यमंत्र्यांचं कॅबिनेट मंत्री म्हणून प्रमोशन झालं आहे. किमान ११ जणांनी राजीनामा आत्तापर्यंत दिला आहे, अशी माहिती आहे.

या नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश

नारायण राणे
सर्बानंद सोनोवाल
डॉ. विरेंद्र कुमार
ज्योतिरादित्य सिंधिया
रामचंद्र प्रसाद सिंग
अश्विनी वैष्णव
पशुपती कुमार पारस
किरेन रिजीजू
राजकुमार सिंह
हरदीप सिंह पुरी
मनसुख मंडाविया
भुपेन्द्र यादव
पुरुषोत्तम रुपाला
जी. किशन रेड्डी
अनुराग सिंह ठाकूर
अनुप्रिया सिंह पटेल
डॉ. सत्यपाल सिंह बघेल
राजीव चंद्रशेखर
शोभा करंडलाजे
भानूप्रताप सिंग वर्मा
दर्शना विक्रम जरदोष
मीनाक्षी लेखी
अनपुर्णा देवी
ए. नारायण स्वामी
कौशल किशोर
अजय भट्ट
बी. एल. वर्मा
अजय कुमार
चौहान देवूसिंह
भागवत खुपा
कपिल पाटील
प्रतिमा भौमिक
डॉ. सुभाष सरकार
डॉ. भागवत कराड
डॉ. राजकुमार सिंह
डॉ. भारती पवार
बिस्वेश्वर तडू
शंतनु ठाकूर
डॉ. मुंजपारा महेंद्रभाई
जॉन बरला
डॉ. एल. मुरगन
निसित प्रमाणिक