Live Update: राज्यात आज एकही ओमिक्रॉन बाधित रुग्णाची नोंद नाही

Live Update: राज्यात आज एकही ओमिक्रॉन बाधित रुग्णाची नोंद नाही
राज्यात आज एकही ओमिक्रॉन बाधित रुग्णाची नोंद झालेली नाही. आजपर्यंत राज्यात एकूण ५४ ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळले आहेत.  यापैकी ३१ रुग्णांची RTCSR चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आज ५४४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ५१५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज दिवसभरात ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या ७ हजार ९३ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.

ऐश्वर्याची ६ तास ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली. पनामा पेपर्स लिक प्रकरणात ऐश्वर्याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते.
एसटीच्या विलीनीकरणाबाबत उच्च न्यायालयात पुढील सुनावणी २२ डिसेंबरला होणार.  अनिल परब हे तोडगा काढत नाही. अनिल परब ,सारखे अल्टिमेटम देतात. एसटी कर्मचाऱ्यांना जाणूनबुजून त्रास दिला जातोय – वकील गुणरत्न सदावर्ते
  विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या अध्यतेखाली उद्या भाजप आमदारांची मुंबईत बैठक होणार आहे.
एसटीच्या विलीनीकरणाबाबत उच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात. कोर्टाने नेमलेली समिती प्राथमिक अहवाल मांडणार.
गुजरातजवळ पाकिस्तान बोटीवरून ४०० कोटींचे ७७ किलोचे हेरॉईन जप्त करण्यात आले. याप्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आहे. कोस्टगार्ड आणि एटीएसने संयुक्तपणे कारवाई केली.
अभिनेता अरमान कोहलीचा जामीन अर्ज हायकोर्टानं फेटाळला. ड्रग्स केसमध्ये अरमान कोहली हा ऑगस्टपासून तुरुंगात आहे. मात्र याच प्रकरणातील दोन अन्य आरोपींचा जामीन अर्ज हायकोर्टाकडनं मंजूर केला. करीम धनानी आणि इम्रान अन्सारी यांची सुटका करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश
विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी टीईटी प्रकरणात तुकराम सुपे यांना अटक करण्यात आली होती. आता सुपेंच्या घरी २ कोटींहून अधिक रक्क सापडल्याचे समोर आले आहे. तसेच पोलिसांनी सोनं देखील हस्तगत केलं आहे.
दिल्लीत पुन्हा दोन ओमिक्रॉनच्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे दिल्लीतील एकूण ओमिक्रॉनबाधितांची संख्या २४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून १२ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.
पनामा पेपर लीक प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायला ईडीने चौकशीसाठी समन्स बजावला.
१२ खासदारांच्या निलंबनबाबत आज मोदी सरकारने विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपस्थिती राहायचे की नाही याचा निर्णय घेण्यासाठी विरोधी पक्षांनी बैठक घेतली.
देशात गेल्या २४ तासांत ६ हजार ५६३ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून १३२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ८ हजार ७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात ८२ हजार २६७ जणांवर उपचार सुरू आहेत.
एसटीच्या विलीनीकरणाबाबत उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.
संसदेतील १२ खासदारांच्या निलंबनासंदर्भात तोडगा काढण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. सरकारने आज निलंबन झालेल्या पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. या १२ निलंबित खासदारांमध्ये शिवसेनेचे २ खासदार असल्यामुळे शिवसेनेलाही निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे आजच्या या गटनेत्यांच्या बैठकीत तोडगा निघणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष आहे. कारण संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधी पक्ष सातत्याने १२ खासदारांचा निलंबनाचा मुद्दा संसदेत मांडत आहेत, तसेच संसदेच्या बाहेर आंदोलनही करत आहेत.
उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे पुढील ४८ तासांत थंडीचा जोर वाढणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तापमानात घट झाली असून उत्तर महाराष्ट्रातील काही भागातील तापमान ८-९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाणार असल्याची शक्यता आहे.
First Published on: December 20, 2021 10:22 AM
Exit mobile version