कोरोना लसीचे साईड इफेक्ट,लस घेतल्यानंतर ३५ हजार महिलांना पाळीसंबंधी तक्रारी

कोरोना लसीचे साईड इफेक्ट,लस घेतल्यानंतर ३५ हजार महिलांना पाळीसंबंधी तक्रारी

जगात सगळ्यात आधी कोरोना लसीकरण सुरू करणाऱ्या ब्रिटनमध्ये आता लसीचे साईड इफेक्टस झाल्याची उदाहरणे समोर येत आहे. विशेष म्हणजे पुरुषांच्या तुलनेत लसीचे साईड इफेक्टस महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाल्याचे समोर आले आहे. ब्रिटनमध्ये कोरोना लस घेतल्यानंतर तब्बल ३५ हजार महिलांना पाळीच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. यातील काहीजणींची तर पाळीच बंद झाल्याने तज्त्रही चक्रावले आहेत. विशेष म्हणजे यातील काहीजणींनी फायझर तर काहीजणींनी मॉर्डनाची लस घेतली आहे.

दरम्यान, लसीचा आणि मासिक पाळीचा काहीही संबंध नसल्याचे लंडन येथील इंपीरियल कॉलेजचे रिप्रोडक्टीव्ह इम्युनलॉजी विभागाच्या प्राध्यापिका डॉक्टर व्हिक्टोरिया माले यांनी म्हटले आहे. माले यांच्या डेटा एनेलेसिस अहवालात लसीमुळे प्रजनन क्षमतेवर किंवा प्रजननाशी संबधित प्रक्रियेवर कोणताही दुष्परिणाम होत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ब्रिटीश जर्नलमध्ये त्यांनी लिहलेल्या लेखातही यावर संशोधन करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

ब्रिटनची मेडिसिन्स अँड हेल्थकेयर प्रोडक्ट्स रेगुलेटरी एजन्सी (MHRA)ने लसीचा पाळीवर परिणाम होत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. तसेच आतापर्यंत केलेल्या संशोधनातून मासिक पाळी आणि लसीचा काहीही संबध नसल्याचे समोर आल्याचे म्हटले आहे. मात्र लस घेतल्यावर प्रतिपिंडांमध्ये होणाऱ्या प्रक्रीयेमुळे मासिक पाळी चक्रात बदल होऊ
शकतात अशीही शक्यता वर्तवली आहे. तर इतर तज्ज्ञांनी डॉक्टर माले यांचा दावा फेटाळून लावला आहे.

 

First Published on: September 16, 2021 7:32 PM
Exit mobile version