याला म्हणतात सोशल डिस्टन्सिंग पाळणे…तुम्हाला आवडली का आयडीया?

याला म्हणतात सोशल डिस्टन्सिंग पाळणे…तुम्हाला आवडली का आयडीया?

कोरोनापासून वाचायचं असेल तर सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाचं आहे. त्यामुळे केवळ भारतात नाही तर जगभरात लोकं सोशल डिस्टन्सिंगच पालन करत आहेत. यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. कुठे दोन हात अंतर ठेवून लोकं चालत आहेत किंवा दुकानात दिसत आहेत. तर कोणी आणखी काही प्रयोग केले आहेत. पण सोशल मीडियावर एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोत सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी लोकांनी चक्क डोक्यावर ‘स्विमिंग पूल नूडल्स’ लावल्या आहेत.

हा कोणत्या एक देशाची गोष्ट नाहीये तर प्रत्येक देशातील पब्लिक हेल्थ एजंन्सी ने लोकांना सोशल डिस्टेंसिंगचे पालन करण्याचा आग्रह केला आहे. केवळ एवढच नाही तर लोकांना सांगितले जात आहे की, ते जेव्हा दुकानात किंवा मार्केटमध्ये जाल तेव्हा एकमेकांपासून ३ ते ६ फूट अंतर ठेवा. या फोटोत तुम्ही बघू शकता लोकांनी आपल्या डोक्यावर स्विमिंग पूल नूडल्य लावले आहेत. आणि रेस्टॉरंटमध्ये फूड एन्जॉय करत आहेत.

या फोटोला सोशल मिडीयावर तुफान प्रतिसाद मिळाला आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी बऱ्याच कमेंट ही केल्या आहे. लोकांना हा फोटो प्रचंड आवडला आहे. अनेकांनी ही क्रिएटीव्ह आयडीया असल्याचं म्हटलं आहे.

या आधी देखील चीनच्या एका शाळेतील मुलांनी सोशल डिस्टन्सिंगच पालन करण्यासाठी हेड गेयर डोक्यावर घालून शाळेत प्रवेश केला. तर काही ठिकाणी मुलांनी कार्डबोर्ड पेपरची हॅट घालून शाळेत मुलं गेली होती. कारण यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाईल.


हे ही वाचा – कोरोनाने माणुसकी संपवली…चंद्रपूरमध्ये आईने पोटच्या मुलालाच नाकारलं!


 

First Published on: May 15, 2020 6:26 PM
Exit mobile version