Live Update: बारावीच्या परीक्षेसंदर्भात निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालय घेणार

Live Update: बारावीच्या परीक्षेसंदर्भात निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालय  घेणार
बारावीच्या परीक्षेसंदर्भात निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालय घेणार आहेत. शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल बारावीच्या परीक्षेसंदर्भात घोषणा करणार आहेत.
मुंबईत आज केवळ ६७६ नव्या बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. २९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.आज मुंबईत ५ हजार ५७० जणांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत सध्या २२ हजार ३९० अँक्टिव्ह रुग्ण आहेत.
मुंबई वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहनांच्या रांगा वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर अवजड वाहनांच्या रांगा पहायला मिळत आहे. काही वेळापासून वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ट्राफिक जॅमचा सामना करावा लागत आहे.
मुंबई मेट्रो लाईन बी / डब्ल्यू डब्ल्यूडब्ल्यू डहाणूकरवाडी व आरे स्थानकांवरील चाचणी कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
मराठा आरक्षण: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरील अभ्यास समितीला अहवाल सादर करण्यासाठी ७ जूनपर्यंत मुदतवाढ
परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर ३०० कोटींचे भ्रष्टाचाराचे आरोप करणारे तक्रारदार गजेंद्र पाटील यांची क्राईम ब्रँचकडून चौकशी सुरू
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन बिहारमधील लॉकडाऊन वाढवल्याची घोषण मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली आहे. ८ जूनपर्यंत बिहारमध्ये लॉकडाऊन असणार आहे.
मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दाखल झाले आहेत. शिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि महापौर किशोरी पेडणेकर देखील उपस्थित आहेत. मुंबईत विमानतळावर टर्मिनल १ आणि २ वरील प्रवेश मार्ग प्रकल्पाचे आज भूमिपूजन आहे. त्याचनिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत.
मुंबईतील काही भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड या भागांमध्ये विजेचा कडकडासह जोरदार पाऊस पडत आहे. घाटकोपर, असल्फातही पावसाच्या सरी
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी ओबीसी आरक्षण, पदोन्नती आरक्षण आणि लॉकडाऊनबाबत बोलण्याची शक्यता आहे.
मुंबईकरांचा प्रवास आता आणखीन सुखकर होणार आहे. कारण आजपासून पश्चिम उपनगरातील मेट्रो-७ आणि मेट्रो-२ ए या मार्गिकांची चाचणी सुरू होणार आहे. डहाणूकर वाडी आणि आरे मेट्रो स्टेशनदरम्यान पहिली चाचणी होणार आहे. आज साडे बारा वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्घाटनासाठी पोहोचतील.
नागपुरात ओबीसी आरक्षणासाठी भाजपचं आंदोलन सुरू. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ठाकरे सरकारवर भाजपची टीका
सेन्सेक्स १०५ अंकांनी वाढून सध्या ५१,५२८.४०वर पोहोचला आहे. तर निफ्टी आता १५,४४६.६० झाली आहे.
देशात ३० मे पर्यंत ३४ कोटी ४८ लाख ६६ हजार ८८३ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी काल दिवसभरात १६ लाख ८३ हजार १३५ नमुन्याच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.
गेल्या २४ तासांत देशात १ लाख ५२ हजार ७३४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३ हजार १२८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर २ लाख ३८ हजार २२ जण बरे होऊन घरी गेले आहेत. सविस्तर वाचा
दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रति लीटर ९४.२३ रुपये आणि डिझेडची ८५.१५ इतकी झाली आहे. तर मुंबईत पेट्रोलच्या किंमतीने शंभरी पार केली आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत १००.४७ रुपये आणि डिझेलची किंमत ८२.४५ इतकी झाली आहे.
ब्रिटनहून १८४ ऑक्सिजन कंस्ट्रेटरची पहिली मालवाहतूक करणारे विमान आज सकाळी भारतात दाखल झाले.
जगभरात अजूनही कोरोनाचा कहर कायम आहे. जगातील कोरोनाबाधितांची संख्या १७ कोटी पार गेली आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगात आतापर्यंत १७ कोटी १० लाख १८ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी आतापर्यंत ३५ लाख ५६ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून १५ कोटी ३१ लाख ११ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी आणि कोरोनाची प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात लॉकडाऊन करण्यात आला होता. हा लॉकडाऊन १ जूनपर्यंत कऱण्यात आला होता. परंतु लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवून १५ जूनपर्यंत करण्यात आला आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्यासंबंधीची घोषणा केली आहे.
शनिवारी राज्यात २० हजारहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. परंतु, रविवारी हा आकडा कमी झाला. आज राज्यात १८ हजार ६०० नव्या कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५७ लाख ३१ हजार ८१५ झाली असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ लाख ७१ हजार ८०१ वर पोहोचली आहे. तसेच ४०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे सध्या राज्यातील मृत्यूदर १.६५ टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत ९४ हजार ८४४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 
मागील २४ तासात मुंबईत २२ कोरोनारुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १ हजार ६६ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. शनिवारच्या तुलनेत रविवारी १८ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. मुंबईत एकाच दिवशी १ हजार ३२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सविस्तर वाचा 
First Published on: May 31, 2021 4:07 PM
Exit mobile version