LockDown: तो म्हणाला, ‘अपना टाइम आएगा’ आणि पोलीस म्हणाले…

LockDown: तो म्हणाला, ‘अपना टाइम आएगा’ आणि पोलीस म्हणाले…

LockDown: तो म्हणाला, 'अपना टाइम आएगा' आणि पोलीस म्हणाले...

कोरोनाव्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात १७ मे पर्यंत लॉकडाऊन आहे. दरम्यान पंतप्रधान मोदींनी लोकांना घरीच राहण्याचे आवाहन केले आहे. लोक घरी आहेत आणि नियमांचे पालन करीत आहेत. परंतु असे काही लोक आहेत जे बाहेर जाऊन नियमांचे उल्लंघन करताना दिसताय. त्यांच्याविरूद्ध पोलिस कडक कारवाई देखील करत आहेत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यामध्ये एक पोलिस आपल्या स्टाईलने लोकांना शिक्षा देत आहे. लोकांना पोलिसाची स्टाईल खूप आवडली असून पोलिस कर्मचारी भागवत प्रसाद पांडे यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

असा आहे हा व्हायरल व्हिडीओ

व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, पोलीस भागवत पांडे बाहेर लॉकडाऊनमध्ये घरा बाहेर फिरणाऱ्या व्यक्तीकडे जातात. त्या व्यक्तीच्या टी-शर्टवर लिहिले होते, ‘अपना टाइम आएगा.’ हे बघितल्यावर पोलिसांनी त्याच्या जवळ जाऊन त्याला सांगितले, ‘तेरा टाइम आ गया.’ . त्यानंतर या पोलिसांनी त्या व्यक्तीला त्यांच्या स्टाईलने समजावून सांगितले आणि त्याला घरी पाठवले. लोकांनी या पोलिसांची ही स्टाईल पसंत करत त्यांनी हा व्हिडीओ यूट्यूबवर शेअर केला आहे.

काही तासांत या व्हिडीओला १ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून ५ हजाराहून अधिक लाईक्सही मिळाले आहेत. त्यांनी कॅप्शनमध्ये असेही लिहिले आहे की, ‘आपल्या घरी रहा आणि लॉकडाऊनचे पालन करा. ते आपल्या हिताचे आहे, देश हिताचे आहे, समाज हिताचे आहे. जय हिंद जय भारत. हारेगा कोरोना जीतेंगे हम.

कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा लागू करण्यात आला, जो १७ मेपर्यंत असणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारने काही सवलतीही दिल्या आहेत.


‘त्या’ महिलेने केली मोस्ट वॉन्टेड नक्षलवाद्याची हत्या; कारण ऐकून बसेल धक्का
First Published on: May 7, 2020 5:11 PM
Exit mobile version