घरदेश-विदेश'त्या' महिलेने केली मोस्ट वॉन्टेड नक्षलवाद्याची हत्या; कारण ऐकून बसेल धक्का

‘त्या’ महिलेने केली मोस्ट वॉन्टेड नक्षलवाद्याची हत्या; कारण ऐकून बसेल धक्का

Subscribe

तब्बल दोन लाख रुपयांचे बक्षिस ठेवण्यात आलेल्या मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी कमांडर बसंत गोप यांच्यावर टाकीने वार करत एका महिलेने त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वृंदा नायक टोळीतील ही घटना मंगळवारी घडली असून गुमला परिसरात गेल्या दशकभर दहशत असलेल्या बसंत गोप या नक्षलवाद्याचा अखेर खात्मा झाला आहे. आपल्या पती आणि मुलांचा जीव वाचवण्यासाठी या महिलेने मुलखा वेगळ धाडस केले असून त्यासाठी गावकऱ्यांनी तिचे कौतुक केले आहे. तर स्थानिक पोलिसांनी बसंत यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.

काय आहे प्रकरण

वृंदा नायक टोळीने गावकऱ्यांना सांगितले की, वृंदा गावातील महुआटोलीमध्ये राहणाऱ्या नक्षलवादी बसंत गोपने मंगळवारी रात्री साधारण साडेआठ वाजता आपल्या सहा सहकाऱ्यांसह नायकटोली स्थित भीम आणि विनीता उराव यांच्या घरी हल्ला केला. त्यांच्या घरी पोहोचताच त्यांनी गोळ्या झाडण्यास सुरूवात केली. त्यामुळे घरातील लोकं भयभीत झाले. विनीता यांनी धैर्य दाखवत पती आणि नवऱ्याला सुरक्षित जागेत आणले आणि स्वःता धोका पत्करून प्रसगांला सामोरी गेल्या. त्यांनी दरवाजा उघडला आणि बसंत गोपसह त्यांचे सहकारी घरात घुसले. विनीता यांनी पूर्ण ताकदीने टांकी घेऊन त्याच्या छातीवर वार केले. त्यांना अशा अचानक झालेल्या हल्ल्याची कल्पना नव्हती. त्यामुळे आपल्या म्होरक्यावर झालेल्या हल्ल्याने घाबरलेल्या नक्षलवाद्यानी बसंतला घेऊन तिथून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गावात बसंतचा शोध घेण्यास सुरूवात केली. दुपारनंतर बसंत गोपचा मृतदेह जंगलात आढळून आला.

- Advertisement -

हेही वाचा –

Corona: आता उच्च न्यायालयात कोट-गाऊन नाही, पँट-शर्टमध्ये उभे राहणार वकील!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -