‘या’ मास्कमुळे पसरतो कोरोना

‘या’ मास्कमुळे पसरतो कोरोना

अमेरिकेच्या कॅरोलिना येथील ड्यूक युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूपासून कोणते मास्क सर्वाधिक संरक्षण देऊ शकतात आणि कोणता मास्क धोकादायक आहे याबाबत संशोधन केलं आहे. यासाठी १४ प्रकारच्या मास्कचं परिीक्षण करण्यात आलं. जगातील बर्‍याच देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून लोकांना मास्क घालण्याचं आवाहन केलं जात आहे.

स्काई न्यूजमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, सर्व प्रकारचे मास्क संसर्गजन्य विषाणूंपासून समान संरक्षण देत नाहीत. तथापि, तपासणीत असं आढळलं की वॉल्व्ह नसलेले एन९५ मास्क सर्वोत्तम संरक्षण प्रदान करतात. यानंतर, थ्री-लेयर सर्जिकल मास्क आणि होममेड कॉटन मास्क देखील संरक्षण करतात. तथापि, रुमालाचे मास्क आणि विणलेले मास्क फारच कमी संरक्षण प्रदान करतात. शास्त्रज्ञांनी Neck fleeces मास्क सर्वात वाईट म्हणून वर्णन केलं आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की Neck fleeces मोठ्या थेंबांना लहान थेंबांमध्ये रूपांतरित करते, ज्यामुळे हा मास्क घातल्याने धोका वाढतो.

सायन्स अ‍ॅडव्हान्सस या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासामध्ये शास्त्रज्ञांनी नमूद केलं आहे की त्यांनी या मास्कचा तपासात समावेश केला होता –
१. थ्री-लेअर सर्जिकल मास्क
२. एन९५ वॉल्व्ह मास्क (सुरक्षित नाहीत)
३. हाताने विणलेला मास्क (सुरक्षित नाही)
४. टू-लेअर-पॉलिप्रॉपिलिन एप्रॉन मास्क
५. कॉटन-पॉलीप्रॉपिलिन मास्क
६. वन–लेअर मॅक्सिमा एटी मास्क
७. टू-लेअर सूती pleated मास्क
८. टू-लेअर ओल्सन स्टाईल मास्क
९. टू-लेअर सूती pleated मास्क
१०. वन–लेअर सूती pleated मास्क
११. गॅटर प्रकार neck fleece (सुरक्षित नाही)
१२. डबल-लेयर बंडाना (सुरक्षित नाही)
१३. टू लेयर कॉटन pleated मास्क
१४. एन९५ मास्क

शास्त्रज्ञांचे म्हणणं आहे की जरी विणलेले मास्क आणि रुमाल फॅशनमध्ये चांगले दिसत असले तरी त्यांची कामगिरी अगदीच खराब आहे. परंतु वैज्ञानिकांनी neck fleece मास्क सर्वात धोकादायक असल्याचं म्हटलं आहे. अभ्यासाचे सह-लेखक डॉ. मार्टिन फिशर म्हणाले आम्हाला हे पाहून आश्चर्य वाटलं की, जेव्हा आम्ही मास्क नसलेल्या थेंबांची तपासणी केली तेव्हा ते क्वचितच आढळले, परंतु Neck fleeces मास्क वापरल्यावर असं आढळलं की थेंबाची संख्या वाढली आहे. याचा अर्थ असा की Neck fleeces मास्क जोखीम वाढवतात.


हेही वाचा – सोन्या चांदीच्या दरवाढीला लागला ब्रेक; जाणून घ्या आजचे दर


 

First Published on: August 11, 2020 2:06 PM
Exit mobile version