घरदेश-विदेशसोन्या चांदीच्या दरवाढीला लागला ब्रेक; जाणून घ्या आजचे दर

सोन्या चांदीच्या दरवाढीला लागला ब्रेक; जाणून घ्या आजचे दर

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. कोरोनाच्या काळात सोन्या चांदीचे दर ७५ हजार पार करून आले. दरम्यान, सोन्या चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या किंमतीला आज ब्रेक लागला असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ६११ रुपयांनी कमी झाला आहे. तर चांदीचे दर तब्बल १४०५ रुपयांनी स्वस्त झाले आहेत. २४ कॅरेट सोन्याचे दर ५५ हजार ५१५ रुपये प्रति तोळा तर चांदीचा दर ७३ हजार ६०८ रुपये किलो आहे.

मागिल तीन दिवसांत दुसऱ्यांदा वायदा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्यानं खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता सराफ बाजारात सोनं खरेदीसाठी हळूहळू लगबग सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे आता सोनं खरेदीला सुगीचे दिवस येतील असा अंदाज आहे. येत्या काळात सोन्याच्या 80 हजारपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचा अंदाजही सराफ बाजारात व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

काय आहेत सोन्या-चांदीचे नवे दर

७ ऑगस्ट – २४ कॅरेट सोनं- ५६,१२६, १० ऑगस्ट– ५५, ५१५

७ ऑगस्ट – २३ कॅरेट सोनं- ५५,९०१, १० ऑगस्ट– ५५, २९३

- Advertisement -

७ ऑगस्ट – २२ कॅरेट सोनं- ५१, ४११, १० ऑगस्ट– ५०, ८५२

७ ऑगस्ट – १८ कॅरेट सोनं- ४२, ०९५, १० ऑगस्ट– ४१, ६३६


हेही वाचा – शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे जलद होतात, सेना आमदारांचा नाराजीचा सूर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -