Coronavirus: कोरोना विषाणूवर वर्षभर काम करूनही लागण नाही!

Coronavirus: कोरोना विषाणूवर वर्षभर काम करूनही लागण नाही!

Coronavirus: कोरोना विषाणूवर वर्षभर काम करूनही लागण नाही!

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. कोरोनाबाधितांची एकूण संख्या २ कोटी ३३ लाख ४० हजार ९३८वर पोहोचली आहे. तर २ लाख ५४ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. प्रत्येक जण कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. पण वर्षभर विषाणूवर काम करूनही कोणालाही कोरोनाची लागण न झाल्याची कौतुस्कापद गोष्ट हैदराबादच्या प्रयोगशाळेतून समोर आली आहे.

जीवघेण्या कोरोनाच्या काळात कोणालाही वर्क फ्रॉम होम सुविधा नसून किंवा सुट्टी नसून सलग मागील १३ महिने हैदराबादमधील प्रयोगशाळेत काम सुरू आहे. या जागतिक पातळीवर प्रयोगशाळेचे नाव सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (CCMB) असे आहे. हैदराबाद स्थित असलेल्या या प्रयोगशाळेत ६६० लोकं दैनंदिन काम करतात. सीसीएमबी प्रयोगशाळेत सध्या कोरोना विषाणूवर संशोधन सुरू असून विषाणूवर संशोधन करून ते लस कंपन्यांना मदत करण्याचे काम येथे केले जाते. मागील १३ महिन्यांपासून या प्रयोगशाळेत दिवसरात्र काम सुरू आहे. पण असे असूनही ना कोणत्या शास्त्रज्ञाला, ना कोणत्या तरुण संशोधकाला किंवा कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली नाही आहे. आतापर्यंत या प्रयोगशाळेत एक कोरोनोबाधित रुग्ण आढळला नाही आहे.

प्रयोगशाळेतील नियमांप्रमाणेच कँटीनमध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते. सर्वांना जेवणाची बंद पाकिटे दिले जातात आणि प्रत्येक टेबमध्ये तीन मीटरचे अंतर ठेवले जाते. तसेच टेबलाचा व्यास दोन मीटर इतका आहे. यामुळे टेबला जवळ असलेले लोकं एकमेकांपासून तीन फूट दूर राहतात.

या प्रयोगशाळेतील संशोधक सांगतात की, आम्ही सर्व सामान्य माणसांप्रमाणेच कुटुंबांना भेटतो. नेहमी सतर्क राहून कार्यालय आणि प्रयोगशाळेत काम करत असतो. फक्त १५ दिवसांसाठी सर्वांनी मास्क लावा, एकमेकांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळा, सॅनिटाईज करा. असे नेहमी करत राहिल्यास कोरोनापासून बचाव होईल.

सीसीएमबीचे संचालक राकेश मिश्रा म्हणाले की, सर्व पथकाला ‘सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे आणि हात धुणे’ या घोषवाक्याची जणू काही सवय झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे आम्ही तर विषाणू बनवत आहोत, पण त्याचे वाहक आम्ही बनलो नाही. हिच सतर्कता लक्षात घेतली पाहिजे.


हेही वाचा – Covid-19 Second Wave: ‘ही’ दहा कारणे देत आहेत कोरोनाची दुसरी लाट थोपवण्याचे संकेत


 

First Published on: May 12, 2021 1:27 PM
Exit mobile version