अजून दोन वर्ष तरी कोरोना काही जात नाही – WHO

अजून दोन वर्ष तरी कोरोना काही जात नाही – WHO

कोरोनाव्हायरस

कोरोनावर मात करण्यासाठी लसीसह उपलब्ध सर्व साधनांचा वापर करावा लागेल, त्यामुळे किमान यासाठी दोन वर्ष लागू शकतात असे मत जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेड्रोस अधनोम घेब्रेसस यांनी व्यक्त केलं आहे. पण हा काळ तरीही १९१८ मध्ये स्पॅनिश फ्लूची साथ घालवण्यास लागलेल्या काळापेक्षा कमीच असणार आहे.

जगभरात २२.८५ दशलक्ष लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ८ लाख लोकांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. तर १९ लाख लोकं कोरोमुक्त झाले आहेत. दक्षिण अमेरिकेतील रुग्णांची संख्या सहा लाखांवर पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिकेत सहा लाख रुग्ण असून १२,८४३ बळी गेले आहेत. ब्रिटनने फ्रान्समधून येणाऱ्या लोकांना स्वप्रमाणपत्र सक्तीचे केले आहे. स्पेन, नेदरलँड्स, बेल्जियम, क्रोशिया, ऑस्ट्रिया या देशांतील लोकांना विलगीकरणाच्या यादीत टाकण्यात आले आहे.

तर सिंगापूरमध्ये ५० नवीन रूग्ण सापडले असून एकूण रूग्णसंख्या आता ५६,२६६ झाली आहे. दक्षिण कोरियात कोरोनाचे रूग्ण लागोपाठ नवव्या दिवशी वाढले असून विषाणूला रोखण्यासाठी टाळेबंदी लागू केली जाणार आहे.

’ स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोफवेन यांनी कोरोना प्रतिबंधासाठी फारशी कठोर धोरणे न राबवल्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. स्वीडनने इतर युरोपीय देशांसारखे कडक निर्बंध लागू केले नव्हते. स्वीडनमधील मृतांची संख्या नॉर्वे, फिनलंड, डेन्मार्क यांच्यापेक्षा अधिक आहे.

अमेरिकेत मॉडर्ना लशीच्या चाचण्या

अमेरिकेत मॉडर्ना लशीच्या चाचणीसाठी १३,१९४ स्वयंसेवकांनी नावे नोंदवली आहेत. तीस हजार जणांची चाचणी करणे आवश्यक आहे. मॉडर्नाची ‘एमआरएनए १२७३’ लस चाचणीच्या पातळीवर आहे. सप्टेंबपर्यंत चाचणीसाठी स्वयंसेवकांची नोंदणी पूर्ण होईल.


हे ही वाचा – Corona Live Update – देशात नवे ७० हजार कोरोना बाधित


First Published on: August 23, 2020 9:01 AM
Exit mobile version