Corona Live Update – गेल्या २४ तासांत मुंबईत ६९० रुग्ण कोरोनामुक्त

coronavirus live update
लाईव्ह अपडेट

मुंबई गेल्या २४ तासांत ९९१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ३४ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनोबाधितांची संख्या १ लाख ३६ हजार ३४८ वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत ७ हजार ४१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत मुंबईत ६९० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत १ लाख १० हजार ६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली आहे.


राज्यात गेल्या २४ तासांत १० हजार ४४१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आज २५८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३६ लाख १६ हजार ७०४ नमुन्यांपैकी ६ लाख ८२ हजार ३८३ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर राज्यातील मृत्यूदर ३.२६ टक्के एवढा असून राज्यात १२ लाख ३० हजार ९८२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर ३४ हजार ८२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर सध्या राज्यात १ लाख ७१ हजार ५४२ Active रुग्ण आहेत. (सविस्तर वाचा)


देशात आतापर्यंत ३० लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण, गेल्या २४ तासात ७० हजार नवीन कोरोनाबाधित


कोरोनाची लक्षणे असतील तरच चाचण्यात करण्यात याव्यात अशी महत्त्वाची नवी सूचना राज्य सरकारने दिल्या आहे.


कोविशिल्ड ही पुण्यातील बायोटेक कंपनी सीरम इन्स्टिट्यूटने विकसित केली आहे. पुण्यातील बायोटेक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दावा केला आहे.


२४ तासांमध्ये देशभरातील रुग्णांमध्ये ६९ हजार ८७८ इतकी विक्रमी वाढ झाली. गेल्या १६ दिवसांत १० लाख नवे बाधित आढळले असून एकूण रुग्णसंख्या २९ लाख ७५ हजार ७०१ झाली आहे. एकूण ५५ हजार ७९४ मृत्यू झाले असून गेल्या २४ तासांत ९४५ मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.