देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ ; 24 तासात 8084 नवे रुग्ण, 10 रुग्णांचा मृत्यू

देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ ; 24 तासात 8084 नवे रुग्ण, 10 रुग्णांचा मृत्यू

देशातील कोरोना रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहे. मात्र देशातील कोरोना रुग्णसंख्येत कालच्य तुलनेच किंचित घट झाली आहे. गेल्या 24 तासात 8084 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाचे 8 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. रविवारी कोरोनाचे 8582 रुग्ण आढळून आले तर चार रुग्णांचा मृत्यू झाला होता. शनिवारी 8329 रुग्ण आढळले होते. (Coronavirus Updates)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 3,482 रुग्ण कोरोनाचे बरे झाले आहेत. यासह सक्रिय रुग्णांची संख्या 47,995 झाली आहे. याशिवाय 10 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 5 लाख 24 हजार 771 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत 4 कोटी 26 लाख 57 हजार 335 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात एकूण 5 लाख 24 हजार 771 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Corona cases in India)

देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आहे. विशेषत: मुंबई, रायगड, पालघर, मुंबई उपनगर, पुणे या सहा शहरांत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान राज्यात 2949 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 1803 कोरोना रुग्ण मुंबईत नोंदवले गेले आहेत. यात 1432 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत एकूण 77 लाख 46 हजार 337 रुग्ण कोरोनातून ठीक होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 97.92 टक्के इतके झालेय. तर कोरोना मृत्यांचा दर हा 1.86 टक्के झाला आहे. (Coronavirus in India)


नॅशनल हेराल्ड केस; राहुल गांधींच्या समर्थनार्थ रॅलीवर बंदी

First Published on: June 13, 2022 11:23 AM
Exit mobile version