Covid-19 updates : गेल्या 24 तासांत देशामध्ये 12 हजार 193 नव्या रुग्णांचे निदान

Covid-19 updates : गेल्या 24 तासांत देशामध्ये 12 हजार 193 नव्या रुग्णांचे निदान

Covid-19 updates: 12 thousand 193 new patients diagnosed in the country in the last 24 hours

नवी दिल्ली : भारतातील कोरोना (Covid-19) संसर्गाचा आलेख दररोज बदलत आहे. पहिल्या दोन दिवसांत प्रकरणांमध्ये वाढ दिसली तर, शुक्रवारी सात टक्क्यांनी घट नोंदवली गेली. आज, शनिवारी पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांची वाढ नोंदवली गेली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, शनिवारी देशभरात कोरोनाचे 12 हजार 193 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर शुक्रवारी ही संख्या 11 हजार 692 होती. त्याच वेळी, सक्रिय रुग्णांची संख्या सतत वाढत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, शनिवारी सकाळपर्यंत देशात कोरोनाचे सक्रिय रुग्ण 67 हजार 556 वर पोहोचले आहेत. म्हणजेच, संसर्ग झाल्यानंतर, बरेच लोक एकतर रुग्णालयात दाखल झाले आहेत किंवा घरी उपचार घेत आहेत. गेल्या 24 तासांत 12 हजार 193 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोना प्रकरणांची संख्या 4,48,81,877 झाली आहे. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, शनिवारी 42 मृत्यू झाले. त्यामुळे मृतांचा आकडा 5,31,300 वर पोहोचला आहे. कोरानाचा सर्वाधिक फैलाव केरळमध्ये आहे. केरळमध्ये दहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दुसरीकडे, कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. 4,42,83,0216 लोकांनी कोरोना विरुद्धची लढाई जिंकली आहे. मृत्यू दर (fatality rate) 1.18 टक्का असून तर कोरोना मुक्तीदर (recovery rate) 98.66 टक्के आहे.

हेही वाचा – Poonch terror attack : कालपर्यंत युद्धाची भाषा… आता बुद्धाची भाषा; ठाकरे गटाची टीका

केंद्राकडून सतर्कतेच्या सूचना
देशात पुन्हा एकदा कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याचे लक्षात घेऊन केंद्र सरकारने महाराष्ट्रासह आठ राज्यांना विशेष सूचना दिल्या आहेत. केंद्राने या राज्यांना संसर्ग दर आणि प्रति 100 चाचण्यांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. महामारी (Pandemic) अद्याप संपलेली नाही. अशा परिस्थितीत प्रत्येक स्तरावर सतर्क राहण्याची गरज आहे. आता आपल्याकडून एखादी जरी चूक झाली तर, त्याचा फटका सहन करावा लागेल, असा इशाराही केंद्र सरकारने दिला आहे. केंद्र सरकारने ज्या राज्यांना कोरोनाबाबत सतर्क राहण्यास आणि वाढत्या प्रकरणांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे, त्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, राजस्थान, केरळ, कर्नाटक, हरियाणा आणि दिल्ली यांचा समावेश आहे.

First Published on: April 22, 2023 12:07 PM
Exit mobile version