CoronaVirus: अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार; मृतांचा आकडा ३० हजार पार!

CoronaVirus: अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार; मृतांचा आकडा ३० हजार पार!

जगभरात कोरोनाचा व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. जगात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आढळले आहेत. अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ncov2019.live या अधिकृत वेबसाईनुसार, आतापर्यंत अमेरिकेत कोरोनाचे ६ लाख ५४ हजार ३४३ सर्वाधिक रुग्ण आढळले असून मृतांचा आकडा ३० हजारहून अधिक झाला आहे. आतापर्यंत अमेरिकेत कोरोनामुळे ३३ हजार ४९० जणांचा मृत्यू झाला आहे. या महामारीमुळे अमेरिकेत सर्वाधिक बळी गेले आहेत.

अमेरिकेच्या पाठोपाठ इटली कोरोना मृतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांक आहे. आतापार्यंत इटलीत २२ हजार १७० जणांचा मृत्यू झाला आहे. तर स्पेनमध्ये १९ हजार १३० आणि फ्रान्समध्ये १७ हजार १६७ जण बळी पडले आहेत.

ज्या देशामुळे कोरोना व्हायरस पसरला म्हणजेच चीनची परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. आतापर्यंत चीनमध्ये ८२ हजार ३४२ कोरोनाग्रस्त आढळले असून ३ हजार ३४२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या चीनमध्ये जे नवे कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत ते परदेशातून येत असल्याचा दावा चीनने केला आहे.

एकूण जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता झपाट्याने वाढत असल्याचं दिसत आहे. आतापर्यंत जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या २१ लाख ३५ हजार ०६५वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या १ लाख ४३ हजार ११४ झाली आहे. तसंच दिलासा देणारी बाब म्हणजे ५ लाख ३९ हजार ६४१ कोरोनाचे रुग्ण हे रिकव्हर झाले आहेत.


हेही वाचा – CoronaVirus: गुजरातच्या वैज्ञानिकांना मोठं यश; कोरोना विषाणूच्या डीएनएची संरचना समजली!


 

First Published on: April 16, 2020 11:36 PM
Exit mobile version