Covid-१९ World Updates: दिलासादायक! जगातील दैनंदिन नोंद होणाऱ्या रुग्णसंख्येत आणि मृत्यूच्या संख्येत घट; एका दिवसात १० हजार मृत्यू

Covid-१९ World Updates: दिलासादायक! जगातील दैनंदिन नोंद होणाऱ्या रुग्णसंख्येत आणि मृत्यूच्या संख्येत घट; एका दिवसात १० हजार मृत्यू

भारतात आढळणाऱ्या कोरोना व्हेरियंटचे WHO कडून नामकरण, डेल्टा आणि कप्पा नावाने ओळखले जाणार हे व्हायरस

जगभरात अजूनही कोरोनाचा कहर सुरू आहे. गेल्या २४ तासांत जगभरात १० हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे आणि ४ लाखांहून अधिक नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. काही दिवसांपासून दैनंदिन नोंद होणाऱ्या नव्या रुग्णसंख्येत आणि मृत्यूच्या संख्येत मोठी घट होताना दिसत आहे.

जॉन्स हॉपकिन्सच्या डेटानुसार, मंगळवारी सकाळी जगातील कोरोनाबाधितांचा आकडा १६ कोटी ७१ लाख १२ हजार ७९३वर पोहोचला. यापैकी मृत्यू झालेल्यांची आकडा ३४ लाख ६९ हजार ५३०वर पोहोचला आहे. दरम्यान ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, सोमवारी ७९० जणांनी जीव गमावला असून मृत्यूची संख्या ४ लाख झाली आहे. तसेच याच दिवशी ३७ हजार ४९८ नवे रुग्ण आढळले असून एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६१ लाख २० हजार पार झाली आहे.

माहितीनुसार सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेल्या अमेरिकेतील २५ प्रातांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक वयोवृद्धाचे लसीकरण पूर्ण झाले. या लोकांना लसीचे दोन डोस दिले गेले आहेत. अमेरिकेची आरोग्य एजेन्सी सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एंड प्रिवेंशन याबाबत माहिती दिली. अमेरिकेत आतापर्यंत ६ लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ३ कोटी ३९ लाख कोरोनाबाधित आढळले आहेत.

भारतात सध्या कोरोना परिस्थिती सुधारताना दिसत आहे. भारतातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २ कोटी ९६ लाख ४२७ इतकी असून यापैकी आतापर्यंत ३ लाख ७ हजार २३१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ कोटी ४० लाख ५४ हजार ८६१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – लखनऊमध्ये सांडपाण्यात आढळला कोरोनाचा विषाणू,तीन ठिकाणांहून गोळा करण्यात आले होते नमुने


 

First Published on: May 25, 2021 11:12 PM
Exit mobile version