Corona Alert: केंद्राचा पत्राद्वारे राज्यांना इशारा; रुग्णालयात रुग्णसंख्या वाढीची वर्तवली शक्यता

Corona Alert: केंद्राचा पत्राद्वारे राज्यांना इशारा; रुग्णालयात रुग्णसंख्या वाढीची वर्तवली शक्यता

कोरोनावर आता दोन नव्या पद्धतीने होणार उपचार ; WHO ची मान्यता

देशात दिवसागणिक कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे सातत्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालय सर्व राज्यांना पत्र लिहून सतर्क करत आहे. आज देखील केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये राज्यांना परिस्थितीवर नजर ठेवण्यास सांगितले आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहित केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, सध्याच्या स्थितीत कोरोना रुग्णांच्या संख्येच्या वाढीदरम्यान ५हून १० टक्के सक्रीय रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचे गरजेचे आहे. परिस्थिती वेगाने बदलत आहे आणि दैनंदिन रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत आहे. अशात रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याची संख्या वेगाने वाढू शकते. त्यामुळे यासाठी आपल्याला तयार व्हावे लागले. म्हणून कोरोना रुग्णसंख्या आणि सक्रीय रुग्णसंख्येवर कडक नजर ठेवा, असा सल्ला राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिला जात आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रात पुढे लिहिले आहे की, देखरेखीच्या आधारावर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेचा आढावा घेण्यात यावा. याशिवाय आरोग्य कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेचा दररोज आढावा घ्यावा. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान रुग्णालयात सक्रीय रुग्णसंख्या २०-२३ टक्क्यांदरम्यान होती.

राजेश भूषण म्हणाले की, देशातील विविध भागात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. यामध्ये ओमिक्रॉन आणि डेल्टा व्हेरिएंटचा समावेश आहे. यासंबंधित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोना व्यवस्थापन आणि मानव संसाधन, विशेषत: आरोग्य कर्मचारी वाढवण्यावर भर देण्यात आला आहे.


हेही वाचा – Maharashtra Corona: राज्यात तिसऱ्या लाटेचा पीक पिरियड कधीपर्यंत आणि ओसरणार कधी? आरोग्यमंत्र्यांचा मोठा खुलासा


 

First Published on: January 10, 2022 8:19 PM
Exit mobile version