Live Update: मंत्रिमंडळात आज पार पडले महत्त्वाचे निर्णय

Live Update: मंत्रिमंडळात आज पार पडले महत्त्वाचे निर्णय
मंत्रिमंडळात आज महत्त्वाचे निर्णय पार पडले आहेत. कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना देण्यासाठी कापूस पणन महासंघाला बँकाकडून कर्ज घेण्यास १५०० कोटीची शासन हमी देण्यात आली आहे. राज्यात शिक्षण पद्धतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम याचे बळकटीकरण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर खासगी बँकांना शासकीय बँकिंग व्यवहार हाताळण्यास मान्यता देण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील 150 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 67 टक्के मतदान झाले, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे 360 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा करण्यात आली होती.
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी विरोधात काँग्रेस आक्रमक झाले आहे. २२ जानेवारीला अर्णवच्या कार्यालयावर काँग्रेस मोर्चा काढणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी माहिती दिली आहे.
नवी मुंबई- गँगस्टर चिंकू पठाणला एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. चिंकू पठाणकडून एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून चिंकू पठाण गँगस्टर करीम लालाचा नातेवाईक असल्याचे समोर आले आहे.
देशात गेल्या २४ तासांत १३ हजार ८२३ नवी कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १६२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच काल दिवसभरात १६ हजार ९८८ रुग्ण  बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आता देशातील कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी ५ लाख ९५ हजार ६६०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ५२ हजार ७१८ जण मृत्यूमुखी पडले असून १ कोटी २ लाख ४५ हजार ७४१ जण कोरोनामुक्त झआले आहेत. तसेच सध्या देशात १ लाख ९७ हजार २०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
देशात १९ जानेवारीपर्यंत १८ कोटी ८५ लाख ६६ हजार ९४७ नमुन्यांच्या चाचण्यांच्या झाल्या आहेत. यापैकी आतापर्यंत ७ लाख ६४ हजार १२० नमुन्यांच्या चाचण्या काल दिवसभरात झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.
आजपासून पंढरपुरात विनापास विठ्ठलाच दर्शन घेतला येणार आहे. मंदिर सुरू झाल्यापासून विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी पास बंधनकारक होता. पण आता विठ्ठलाचं थेट दर्शन घेता येणार आहे.
जगातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या प्रमाणानुसार कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगात कोरोनाबाधितांची संख्या ९ कोटी ६६ लाख २१ हजारावर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २० लाख ६५ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून ६ कोटी ९२ लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.
First Published on: January 20, 2021 2:25 PM
Exit mobile version