Live Update: पिंपरी चिंचवड ते निगडी कॉरिडॉर उन्नत मेट्रो प्रकल्पास मान्यता

Live Update: पिंपरी चिंचवड ते निगडी कॉरिडॉर उन्नत मेट्रो प्रकल्पास मान्यता

आज (बुधवारी) मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 

  • राज्यात कौशल्य विद्यापीठ उभारणार, विद्यापीठ विधेयक २०२१ विधिमंडळात मांडणार
  • पिंपरी चिंचवड ते निगडी कॉरिडॉर उन्नत मेट्रो प्रकल्पास मान्यता
  • नाविन्यपूर्ण कॅरेव्हॅन पर्यटन धोरणास मंजुरी

नागपुरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ३५ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. माहितीनुसार, यामधील १३ डेन्टल, १२ एमबीबीएस आणि ९ पोस्ट ग्रॅज्युवेशन करणारे विद्यार्थी आहेत. तसेच यामध्ये ३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शिवाय २७ विद्यार्थ्यांना भरती करण्यात आले आहेत. ही आकडेवारी समोर येताच नागपूरमध्ये कोरोना कम्युनिटी स्प्रेंड झालेला आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.


आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणापासून लांब का ठेवले जातंय – आशिष शेलार

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या आकडेवारीचा आलेख हा खाली होता. मात्र, आता अचानक ही आकडेवारी वाढताना दिसत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी सावधगिरी बाळगली नाहीतर पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करावा लागेल, असे संकेत राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. यावर भाजपा आमदार आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ‘लॉकडाऊनची भाषा करता आणि रात्री १ वाजेपर्यंत पब, बार सुरु ठेवता ही विरोधाभासी भूमिका आहे’, असा टोला शेलाराने राज्य सरकारला लगावला आहे.


रेल्वेच्या परीक्षेस निघालेल्या विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात

मध्य प्रदेशमध्ये मंगळवारी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ४७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ५४ प्रवाशांनी भरलेली बस मंगळवारी सकाळी सतानाच्या दिशेने जात होती. त्या दरम्यान, बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस ३० फूट खोल दरीत कोसळली. या बसमध्ये सर्वात अधिक विद्यार्थ्यांचा समावेश होता. हे विद्यार्थी रेल्वेची परीक्षा देण्यासाठी निघाले होते. मात्र, परीक्षा देण्याआधीच विद्यार्थ्यांचे आयुष्य संपले.


काळाचौकीमध्ये ज्वेलर्सवर दरोडा

मुंबईच्या काळाचौकीमध्ये मंगल ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा घातल्याची घटना १५ फेब्रुवारी रोजी घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून या दरोड्यामध्ये तब्बल २ कोटी ८३ लाखांचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरुन नेला आहे. या चोरांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडले आहेत. तसेच सीसीटीव्ही फुटेज ज्या टीव्हीमध्ये सेव्ह होतात. ती डिव्हीआर मशीन देखील पळवून नेली आहे. त्यामुळे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे. पोलीस याप्रकरणी चोरांचा शोध घेत आहेत.


मुंबईकरांनो सावध व्हा! ‘ही’ आहे धोक्याची घंटा

गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कोरोनाच्या काळात बंद करण्यात आलेली मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेली लोकल देखील सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि १ फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा सर्वसामान्यांसाठी लोकल धावू लागली. मात्र, आताचे चित्र पाहिले असता कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. रुग्णसंख्येचा खाली गेलेला आलेख पुन्हा एकदा वर जाऊ लागला आहे. त्यामुळे यंत्रणांसह सामान्य नागरिकांसाठी ही धोक्याची घंटा असून कोरोनाविषयी बेफिकीर होणे धोकादायक ठरेल, असा सल्ला राज्याच्या टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.


 जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा आजचा दर

दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सर्व सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. दररोज होणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे वाहनचालकांचे पुरते कंबरडे मोडले असून दररोज पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची मालिका केव्हा थांबणार असा एकच प्रश्न वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे. आजही राज्यासह अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. आज मुंबईमध्ये पेट्रोल ९५ रुपयांवर गेले. तर डिझेल ८६ रुपयांवर गेले आहे.


मुजोर टोलनाक्याला मनसे दणका, रुपाली पाटील यांची फास्ट टॅगवरुन वादावादी

मनसेच्या महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांची रात्री किणी टोल नाक्यावर फास्ट टॅगमुळे झालेल्या वाहतूक कोंडीवरुन वाद झाला. मनसे नेत्या रुपाली पाटील या रात्री किणी टोलनाक्यावर पोहोचल्या तेव्हा प्रचंड वाहतूक कोंडी टोल नाक्यामुळे झाली होती. फास्ट टॅग सुरु होण्यास काही तासांचा वेळ होता परंतु फास्ट टॅग प्रणालीमुळे ५ ते ६ किलोमीटल लांब वाहनांच्या रांगा लागल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी मनसे नेत्या रुपाली पाटील यांनी मनसे स्टाईलने वाहतूक सुरळीत केली आहे. यावेळी किणी टोलनाक्यावर मनसे नेत्या रुपाली पाटील आणि टोलनाका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात वादावादी झाली आहे.


राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचे संकट!

राज्यभरात सध्या थंडीचा मोसम सुरु असताना अवकाळी पाऊस डोकेवर काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण मुंबई, कोकण वगळता राज्यातील इतर भागात पुढील काही दिवस ढगाळ वातावरणाचा सामना करावा लागणार आहे. कारण मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने येत्या ४८ तासाच पुणे, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खान्देश या भागात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. परंतु अवकाळी पावसाच्या अंदाजामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.


कन्नड शहरात भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड शहरात भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ७ जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कन्नड शहरातील चौधरी पेट्रोल पंपाजवळ ट्रक आणि क्रूझर वाहनात झाला अपघात झाला.


दहावी, बारावीच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर

राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणार्‍या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक अखेर राज्य शिक्षण मंडळाने मंगळवारी जाहीर केले. त्यानुसार बारावी बोर्डाची परीक्षा २३ एप्रिलपासून सुरु होणार असून दहावीची परीक्षा २९ एप्रिलला सुरु होणार आहे. दरम्यान, हे संभाव्य वेळापत्रक बोर्डाने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केले आहे.

First Published on: February 17, 2021 4:59 PM
Exit mobile version