Live Update: भारतातील नवीन कोरोना स्ट्रेनच्या रुग्णांची संख्या २५ वर!

Live Update: भारतातील नवीन कोरोना स्ट्रेनच्या रुग्णांची संख्या २५ वर!
ब्रिटनहून भारत आलेल्या एकूण २५ प्रवाशांमध्ये नवीन कोरोना स्ट्रेन आढळला आहे.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. एकनाथ खडसे पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सर्दी, खोकला, ताप असल्यामुळे ते मागील काही दिवसांपासून क्वारंटाईन झाले होते.
निफ्टीचा नवा रेकॉर्ड, १४ हजार अंकावर उसळी घेतली आहे. मार्चमध्ये ७ हजार ५११ पर्यंत घसरलेल्या निफ्टीची आता विक्रमी वाटचाल आहे. हे कोरोनाच्या संकटातून अर्थव्यवस्था सावरत असल्याचे संकेत आहे.
देशात गेल्या २४ तासांत २१ हजार ८२१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच २६ हजार १३९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी २ लाख ६६ हजार ६७४ झाली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४८ हजार ७३८ रुग्णांचा मृत्यू झाला असून ९८ लाख ६० हजार २८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या देशातील २ लाख ५७ हजार ६५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
३० डिसेंबरपर्यंत देशात १७ कोटी २० लाख ४९ हजार २७४ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी आतापर्यंत ११ लाख २७ हजार २४४ नमुन्यांच्या चाचण्या काल (गुरुवारी) दिवसभरात झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.
जगभरात अजूनही कोरोना व्हायरसचा कहर कायम आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाबाधितांची संख्या ८ कोटी ३० लाख ६० हजार पार झाली आहे. यापैकी आतापर्यंत १८ लाख १२ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून ५ कोटी ८८ लाख ६१ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.
First Published on: December 31, 2020 12:04 PM
Exit mobile version