Live Update: राज्याच्या आकडेवारीने ‘या’ देशांना टाकले मागे

Live Update: राज्याच्या आकडेवारीने ‘या’ देशांना टाकले मागे

गेल्या २४ तासांत मुंबईत १ हजार १८८ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ३२ हजार २०४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ११ हजार ४९५ जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 


राज्यात गेल्या २४ तासांत १० हजार १८७ नव्या वाढ रुग्णांची वाढ झाली असून ४७ जणांच्या मृत्यू नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २२ लाख ८ हजार ५७६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५२ हजार ४४० जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 


मनसुख हिरेन यांचं पार्थिव निवासस्थानी पोहोचलं आहे. हिरेन यांच्या इमारती जवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मनसुख हिरेन यांचा मृतदेह हिरेन कुटुंबीयांनी राहत्या घरी आणला, मृतदेहावर होणार अंत्यसंस्कार

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Saturday, March 6, 2021

 


मनसुख हिरेन प्रकरणावर गृहमंत्री अनिल देशमुख आणि पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्यात महत्त्वाची बैठक सुरू आहे. अनिल देशमुख यांचं शासकीय निवासस्थान ज्ञानेश्वरी येथे ही बैठक सुरू आहे.


मनसुख हिरेन यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीय तयार झाले आहेत. काही तासांत मनसुख यांच्या अंतसंस्कार करण्यात येतील.


बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांनी कुपर रूग्णालयात कोरोना लसीचा पहिला डोस घेतला


दिनांक 28 फेब्रुवारी रोजी रात्री 12:30 वाजता ठाण्यातील एका पब मध्ये आलेल्या दोन गिऱ्हाहिकांच्या भांडणाचं पर्यावसन हाणामारी मध्ये झाले व त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली, या बद्दल थोडक्यात हकीकत अशी अभिमन्यू निंबाळकर व जय दखणा हे दोघे पब मध्ये आले होते त्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या रितेश शेट्टी या दुसऱ्या गिऱ्हाइका बरोबर या दोघांची बाचबाची झाली व त्याचे रूपांतर मारामारी मध्ये झाले, त्या दरम्यान अभिमन्यू निंबाळकर याने रितेश शेट्टीला तुला आता जिवंत सोडत नाही असे म्हणून एअर रायफल काढून हवेत गोळीबार केला,या प्रकरणी चितळसर पोलीस स्टेशन मध्ये 506,323,504 कलामा सह आर्म एक्ट 3,25 व 4,25 प्रमाणे अभिमन्यू निंबाळकर व अजय दखणा यांना अटक केली आहे व त्यांच्या कडून एअर गन, तलवार, एअर रायफल व ब्रेझा कार जप्त करण्यात आली आहे.


भाजप आमदार मंगलप्रभात लोढा मनसुख हिरेन यांच्या कुटुंबियांच्या भेटीला


केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिल्लीतील RML रूग्णालयात घेतला कोरोना लसीचा पहिला डोस


मनसुख हिरेन यांचा मृतदेह घेण्यास कुटुंबियांचा नकार, आधी पोस्टमॉर्टम रिपोर्ट जाहीर करा, कुटुंबियांची मागणी

जोपर्यंत शवविच्छेदन अहवाल सार्वजनिक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. मनसुख हिरेनच्या कुटूंबियांनी दिली पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे यांना माहिती. अॅटॉप्सी रिपोर्ट, मृत्यूचे कारण आणि शवविच्छेदनाचे छायाचित्रीकरण आम्हाला द्या, अशी देखील मनसुख हिरेन यांच्या परिवाराची मागणी आहे.


केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या पत्नीसह कोरोना लसीचा पहिला डोस घेतला


देशात कोरोनाचा कहर सुरू असून गेल्या २४ तासात १८ हजार ३२७ नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर १०८ जणांचा कोरोनाने बळी गेला अल


मुलुंड पश्चिम एलबीएस रोड वरील वसंत ऑस्कर या कॉप्लेक्स मध्ये मुलाने वडील आणि आजोबांची हत्या करून आत्महत्या केली पोलीस घटनास्थळी दाखल


राज्यात कोरोनाचा कहर पुन्हा सुरू होताना दिसतोय. शुक्रवारी एका दिवसात राज्यात १० हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. साधारण ५ महिन्यानंतर पुन्हा कोरोनाबाधितांचा एका दिवसातील आकडा १० हजारांवर गेल्याने चिंता वाढली आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २१ लाख ९८ हजार ३९९ झाली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं की, राज्यात काल, शुक्रवारी १० हजार २१६ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली तर नवीन ६४६७ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण २०,५५,९५१ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ८८,८३८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९३.५२ % झाले आहे, असं टोपेंनी सांगितले आहे.


‘मुथूट ग्रुप’मधील ‘मुथूट फायनान्स’ ही देशातील सर्वात मोठी नॉन-बँकिंग गोल्ड लोन वित्तीय कंपनी आहे. या मुथूट ग्रुपचे अध्यक्ष एमजी जॉर्ज मुथूट यांचे शुक्रवारी (५ मार्च) संध्याकाळी निधन झाले. जॉर्ज मुथूट ७२ वर्षांचे होते.


भिवंडीत भीषण आगीचे सत्र कायम सुरू असून भिवंडी शहरातील धामणकर नाका येथील सोनीबाई कंपाउंड परिसरात यंत्रमाग कारखान्याला भीषण आग लागली. या आगीत २ यंत्रमाग कारखाना व १ कापडाचे गोदाम जळून खाक झाल्याची माहिती मिळतेय. दरम्यान या भीषण आगीचे कारण अस्पष्ट असल्याचे सांगितले जात आहे. लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या असून ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.

First Published on: March 6, 2021 9:28 PM
Exit mobile version