Corona Update: मुंबईकरांसाठी दिलासादायक! नवीन रुग्णसंख्येपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

Mumbai corona Update Number of active corona victims in Mumbai 1 thousand 945
Mumbai Corona Update : मुंबईकरांना मोठा दिलासा, २४ तासात शून्य रुग्ण मृत्यूसह ४४ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधितांची संख्या १ हजार होतोना दिसत आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पण आज मुंबईकरांसाठी रुग्णांच्या आकडेवारीत पॉझिटिव्ह बाब आहे. आज नवीन रुग्णसंख्यांपेक्षा बरे होण्याऱ्यांची संख्या अधिक आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत १ हजार १८८ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ३२ हजार २०४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ११ हजार ४९५ जणांचा मृत्यू झाला आहे.

आज दिवसभरात १ हजार २५३ रुग्ण बरे झाले असून ३ लाख ९ हजार ४३१ रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या १० हजार ३९८ रुग्णांवर उपचार सुरू आहे. आज मृत्यू झालेल्या ५ रुग्णांपैकी ४ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. यामध्ये २ रुग्ण पुरुष आणि ३ रुग्ण महिला होत्या. १ चे वय ४० वर्षा खाली होते, ३ जणांचे वय ६० वर्षावर होते. तर उर्वरित १ रुग्णाचे वय ४० ते ६० वर्षा दरम्यान होते.

सध्या मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर ९३ टक्के असून दुप्पटीचा दर २३७ दिवस आहे. ५ मार्चपर्यंत ३३ लाख ९३ हजार ३९२ कोरोनाच्या एकूण चाचण्या झाल्या आहेत. मुंबईतील अजूनही १७३ इमारती सीलबंदी आहेत. तसेच १५ सक्रिय कंटनमेंट झोन आहेत.


हेही वाचा – Corona In Maharashtra: कोरोनाचा कहर! राज्यातील बाधितांची एकूण संख्या २२ लाख पार!