Coronavirus: गायीच्या शरीरातील अँटीबॉडीजमुळे कोरोनावर होईल मात; अमेरिकन कंपनीचा दावा

Coronavirus: गायीच्या शरीरातील अँटीबॉडीजमुळे कोरोनावर होईल मात; अमेरिकन कंपनीचा दावा

Coronavirus: गायीच्या शरीरातील अँटीबॉडीजमुळे कोरोनावर होईल मात; अमेरिकन कंपनीचा दावा

कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी वैज्ञानिकांना एक नवीन शस्त्र सापडले आहे. गायीच्या शरीरात हे शस्त्र सापडले आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी गायीच्या शरीरातील अँटीबॉडीज वापर केला जाऊ शकतो, असा दावा अमेरिकेचा बायोटेक कंपनीने केला आहे. अमेरिकन बायोटेक कंपनी सैब बायोथेराप्यूटिक्सने म्हटले आहे की, जेनेटिकली मॉडीफाइड गायींच्या शरीरारतून अँटीबॉडी काढून कोरोना विषाणूवर मात करणारे औषध तयार केली जाऊ शकते. लवकरच कंपनी याची क्लिनिकल ट्रायल सुरू करणार आहे.

जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील संसर्गजन्य रोगांचे चिकित्सक अमेश अदाल्जा म्हणाले की, ‘सकारात्मक, विश्वासार्ह आणि आश्वासक हा दावा आहे. आपल्याला कोरोना विषाणूला हरवण्यासाठी वेगवेगळे शस्त्रे वापरणे गरजेचे आहेत.’ अँटीबॉडीजची तपासणी प्रयोगशाळेत पेशी किंवा तंबाखूच्या झाड्यावर करतात. परंतु बायोथेराप्यूटिक्स २० वर्षांपासून गायीच्या खुरामध्ये अँटिबॉडीज विकसित करत आहे .

ही कंपनी गायींमध्ये अनुवांशिक बदल करते. जेणेकरून त्यांच्या रोगप्रतिकारक पेशी अधिक वाढू शकतील. ज्यामुळे त्या धोकादायक आजारांशी चांगल्या प्रकारे लढू शकतील. त्यामुळे या गायी मोठ्या प्रमाणात अँटीबॉडीज तयार करतात ज्याचा उपयोग मानवांसाठी होऊ शकतो.

पिट्सबर्ग विद्यापीठाचे इम्यूनोलॉजिस्ट विल्यम किलमस्ट्रा म्हणाले की, ‘या कंपनीच्या गायीमधील अँटीबॉडीजमध्ये कोरोना विषाणूच्या स्पाइक प्रोटीनचा नाश करण्याची ताकत आहे. गाय स्वतः बायोरिएक्टर आहे. भयानक रोगांविरोधात लढण्यासाठी ती मोठ्या प्रमाणात अँटीबॉडीज तयार करते.’

सैब बायोथेराप्यूटिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एडी सुलिवान यांनी सांगितले की, ‘इतर लहान जीवांच्या तुलनेत गायींजवळ जास्त रक्त असते. त्यामुळे त्याच्या शरीरात अँटीबॉडीज देखील जास्त तयार होतात. ज्याचा नंतर माणसांमध्ये वापर केला जाऊ शकतो.’

तसेच ते पुढे म्हणाले की, ‘जगातील बहुतेक कंपन्या कोरोना विषाणू विरोधात लढण्यासाठी मोनोक्लोनल अँटीबॉडीज विकसित करत आहेत. गायींमधील चांगली गोष्ट म्हणजे त्या पॉलीक्लोनल अँटीबॉडी तयार करतात. कोणत्याही विषाणूच्या नाश करण्यासाठी त्या कोणत्याही मोनोक्लोनल अँटीबॉडीजपेक्षा अधिक सक्षम आहेत.’


हेही वाचा – मालदीव-श्रीलंका नंतर आयएनएस शार्दुल इराणमधून भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी रवाना


 

First Published on: June 8, 2020 11:53 PM
Exit mobile version