काँग्रेसच्या खासदारांचे कोरोनामुळे निधन; पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख

काँग्रेसच्या खासदारांचे कोरोनामुळे निधन; पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख

काँग्रेसच्या खासदारांचे कोरोनामुळे निधन; पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख

कन्याकुमारीचे काँग्रेसचे खासदार एच.वसंत कुमार यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्यावर १० ऑगस्टपासून चेन्नईमधील अपोलो रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, उपचार सुरु असतानाच त्यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी दु:ख व्यक्त केले आहे.

पंतप्रधानांनी केले ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत दु:ख व्यक्त केले आहे. ‘लोकसभा सदस्य खासदार एच. वसंतकुमार यांच्या निधनाने दु:ख झाले. त्यांचे व्यवसाय आणि सामाजिक काम खूप होती. मी त्यांना ज्या ज्या वेळी भेटलो त्या त्या वेळी त्यांच्या तामिळनाडूच्या प्रगतीसाठीचे प्रयत्न पाहिले. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि समर्थकांप्रती सहवेदना. ओम शांती’.

राहुल गांधीने व्यक्त केले दु:ख

‘कन्याकुमारीचे खासदार एच. वसंतकुमार यांचे कोविड १९ मुळे झालेले निधन खूप धक्कादायक आहे. त्यांनी लोकांसाठी केलेली सेवा आणि काँग्रेसच्या विचारांशी निष्ठा नेहमीच मनात घर करुन राहिल. त्यांच्या कुटुंबीयांना आणि स्नेहींसोबत सहवेदना’.


हेही वाचा – Corona: मृतांच्या संख्येत भारत तिसऱ्या स्थानावर


 

First Published on: August 29, 2020 11:49 AM
Exit mobile version