Corona: मृतांच्या संख्येत भारत तिसऱ्या स्थानावर

जगभरातील कोरोनाबाधितांच्या एकूण मृत्यूंच्या संख्येत भारत तिसऱ्या स्थानावर पोहोचला असून भारतात आतापर्यंत कोरोनामुळे ६२ हजार ५५० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

corona origin india

जगभर पसरणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. देशात दररोज ५० ते ६ हजरांच्या संख्येने नव्या रुग्णांची नोंद होत आहे. तर मृत्यूच्या आकडेवारीत देखील वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. जगभरातील कोरोनाबाधितांच्या एकूण मृत्यूंच्या संख्येत भारत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. भारतात आतापर्यंत कोरोनामुळे ६२ हजार ५५० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापूर्वी भारतापेक्षा सर्वाधिक मॅक्सिकोत ६२ हजार ५९४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. तर आतापर्यंत कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू अमेरिका आणि ब्राझीलमध्ये झाले आहेत.

अमेरिकेत करोनामुळे १ लाख ८५ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे त्या खालोखाल ब्राझीलमध्ये १ लाख १९ हजार जणांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. तर भारतात जून महिन्यात अनलॉक प्रक्रिया राबवण्यास सुरूवात झाल्यानंतर कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येत आणि करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

भारतात यापूर्वी १० लाख व्यक्तींमागे मृत्यूंची संख्या ही ५ इतकी होती. ती आता १० लाख व्यक्तींमागे ४५ इतकी झाली आहे. तर प्रत्येक १० लाखांमागे रुग्णांची संख्याही आता वाढून २ हजार ५५४ इतकी झाली आहे.

देशात २४ तासांत ७६ हजार नवे रुग्ण

भारतातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. भारतात गेल्या २४ तासांत ७६ हजार ४७२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, कोरोनामुळे १ हजार २१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशभरातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ३४ लाखांवर जाऊन पोहचला आहे. तर सध्या ७ लाख ५२ हजार ४२४ Active कोरोना रूग्ण असल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत देण्यात आली आहे.

२६ लाख रुग्ण कोरोनामुक्त

कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्याप्रमाणे कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचीही आकडेवारी अधिक आहे. आतापर्यंत भारतात २६ लाख ४८ हजार ९९९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत ६२ हजार ५५० जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.


हेही वाचा – जपानमधील संशोधकांनी सांगितला Corona नष्ट करण्याचा फॉर्म्युला