Covid-19: दिल्ली AIIMS मध्ये लहान मुलांवर Covaxin लसीची क्लिनिकल ट्रायल सुरू

Covid-19: दिल्ली AIIMS मध्ये लहान मुलांवर Covaxin लसीची क्लिनिकल ट्रायल सुरू

Covaxin लसीचे दोन डोस symptomatic कोरोना रुग्णांवर ५० टक्के प्रभावी, संशोधन अहवाल

लहान मुलांवरील भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीची क्लिनिकल चाचणी आजपासून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात सुरू झाली आहे. आज साधारण २५ मुले या क्लिनिकल चाचणीमध्ये सहभागी झाले होते, ज्यांचे स्क्रीनिंग आणि चाचणी घेण्यात आली आहे. ज्या मुलांना चाचणीत अन्टीबॉडीज मिळत नाहीत अशा मुलांना लसीच्या चाचणीमध्ये समाविष्ट केले जाणार असून त्यांना कोरोना लस दिली जाणार आहे. आज सायंकाळी उशिरापर्यंत या चाचणीचा अहवाल येईल आणि ही लस लवकरात लवकर मुलांना दिली जाईल, अशी अपेक्षा आहे.

या चाचणीत ही लस सुरक्षित आणि इम्युनोजेनिक आहे की नाही याची पडताळणी करण्यात येणार आहे. ही लस मुलांना प्रभावी आहे की नाही? याचा देखील अभ्यास करणार आहे. या चाचणीकरता मुलांना तीन गटात विभागले गेले. पहिला गट १२ ते १८ वर्षे आहे, ज्यामध्ये या वयोगटातील क्लिनिकल चाचण्यांच्या स्वयंसेवकांना लस डोस दिला जाणार आहे. यानंतर, लस चाचणीमध्ये ६ ते १२ वर्षे वयोगटातील मुले आणि नंतर २ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांना समाविष्ट केले जाणार आहे.

भारतातील विविध केंद्रांमधील ५२५ मुलांवर या लसीची चाचणी केली जाणार आहे. त्यापैकी सुमारे ५० मुलांवर दिल्ली एम्समध्ये चाचणी करण्यात येणार आहे. या चाचणीचे प्रिंसिपल इन्वेस्टिगेटर डॉ. संजय राय यांच्या मते, आतापर्यंत या चाचणीत सहभागी होण्यासाठी दहापटाहून अधिक अर्ज आले आहेत.


शिक्षण, नोकरी, टोकयो ऑलिम्पिक निमित्ताने आंतरराष्ट्रीय प्रवास करताय ? लसीकरणासंबंधी केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जारी

First Published on: June 7, 2021 9:47 PM
Exit mobile version