दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरण, राहुल गांधीनी पिडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन केली न्यायाची मागणी

दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरण, राहुल गांधीनी पिडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन केली न्यायाची मागणी

दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरण, राहुल गांधीनी पिडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन केली न्यायाची मागणी

दिल्लीमध्ये अल्पवयीन दलित मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मुलीची हत्या करुन परस्पर अंत्यसंस्कारही करण्यात आले आहेत. पिडीत अल्पवयीन मुलगी स्मशानातील वॉटर कूलरमधून पाणी आणण्यासाठी गेली होती. पिडितेच्या कुटुंबीयांना पुजाऱ्याने शॉक लागून मृत्यू झाला असल्याचे कारण सागितले आहे. मात्र कुटुंबीयांनी आरोप खोटे असल्याचे म्हटलं आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पिडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केलं आहे. तसेच जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत तुमच्यासोबत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

दिल्लीतील ओल्ड नांगल गावात धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन दलित मुलगी स्मशानातील वॉटर कूलरमधून पाणी आणण्यासाठी गेली होती. स्मशानात मुलीवर बलात्कार करुन चिती हत्या केली. कुटुंबीयांना सत्य कळू नये यासाठी स्मशानातील पुजाऱ्याने त्यांना विजेचा झटका बसल्यामुळे मृत्यू झाला असल्याचे सांगितले. तसेच कुटुंबीयांची लांबून भेट देऊन लगेच अंत्यससंस्कारी केले आहे. मात्र मुलीची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप मुलीच्या आईने केला आहे. या आरोपाखाली पुजाऱ्यासह ४ आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दिल्लीतील या पिडीत कुटुंबीयांची भेट घेतली आहे. कुटुंबीयांचे सांत्वन करुन कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी केली आहे. या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत पिडीतेच्या कुंबीयांसोबत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

आरोपींचा बनाव

स्मशानातील पुजारी आणि इतर आरोपींनी पिडितेवर सामुहिक अत्याचार केला यानंतर मुलीची हत्या केली. कुटुंबीयांना सत्य कळता कामा नये यासाठी वॉटर कूलरचा करंट लागला असल्याचे खोटं सांगितले. मुलीच्या मृत्यूविषयी पोलिसांना सांगितले तर ते शवविच्छेदन करुन अवयव काढून घेतील अशी भीती कुटुंबीयांनी घातली गेली. कुटुंबीयांच्या परवानगीविनाच घाई गडबडीत अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात केली. कुटुंबीयांनी मुलीचे ओठ काळे पडले असल्याचे पाहिलं होतं. यामुळे सर्व प्रकार पोलिसांना सांगून तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपांनी ताब्यात घेतलं असून अधिक चौकशी करत आहेत.

First Published on: August 4, 2021 1:35 PM
Exit mobile version