या राज्यात दारु झाली महाग; ७० टक्के कोरोना टॅक्स आकारणार

या राज्यात दारु झाली महाग; ७० टक्के कोरोना टॅक्स आकारणार

दिल्ली सरकारने सोमवारी रात्री मोठा निर्णय घेत दारूच्या किंमतीत ७० टक्क्यांनी वाढ केली आहे. दिल्ली सरकारने ‘स्पेशल कोरोना फी’ अंतर्गत हा कर वाढवला आहे. मंगळवारपासून म्हणजेच आजपासून वाढीव दर लागू होतील. दिल्ली सरकारने एमआरपीवर ७० टक्के कर जाहीर केला आहे, म्हणजेच दिल्लीत दारूची एक बाटली १००० रुपयांना मिळत होती, ती मंगळवारपासून १७०० रुपयाला मिळेल. सोमवारपासून अनेक ठिकाणी दारुची दुकानं सुरु झाली. त्यामुळे दिवसभर दारूच्या दुकानांसमोर लोकांची गर्दी होती. कोरोनाला रोखण्यासाठी शारीरिक अंतरावर जोर देण्यात येत आहे. परंतु मद्यपान करणार्‍यांना केवळ बाटलीच दिसली आणि शारीरिक अंतर राखण्याच्या सरकारच्या आदेशाला हरताळ फासला.


हेही वाचा – Coronavirus: अमेरिकेत १ लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो; ट्रम्प यांचा दावा


दारुची दुकानं सकाळी ९ ते सायंकाळी साडेसहा या वेळेत खुले राहतील. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकांना कायद्याचं अनुसरण करण्याचं आवाहन केलं आहे जेणेकरुन दिल्लीत औद्योगिक व्यवसाय हळूहळू उघडता येतील. ते म्हणाले की जर लोकांनी नियमांचे पालन केलं नाही तर सूट मागे घेतली जाईल.

 

First Published on: May 5, 2020 9:13 AM
Exit mobile version