घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCoronavirus: अमेरिकेत १ लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो; ट्रम्प यांचा दावा

Coronavirus: अमेरिकेत १ लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो; ट्रम्प यांचा दावा

Subscribe

यापूर्वी एप्रिलमध्ये ट्रम्प यांनी कोरोना विषाणूमुळे अमेरिकेतील ६० हजार लोकांचा मृत्यू होईल असा अंदाज बांधला होता.

अमेरिकेत कोरोना विषाणूने तब्बल एक लाख लोकांचा मृत्यू होईल, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. दरम्यान, त्यांनी कोरोनासाठी चीनला जबाबदार धरत आरोप केले आहेत. कोरोना विषाणूच्या चिनी स्त्रोताबद्दल ठोस अहवाल सादर करु, असं आश्वासन ट्रम्प यांनी दिलं.

अमेरिकेतील मृत्यूंबद्दल बोलताना ट्रम्प म्हणाले, “आम्हाला विश्वास आहे की या वर्षाच्या अखेरीस कोरोना विषाणूची लस विकसित होईल.” दरम्यान, यापूर्वी एप्रिलमध्ये ट्रम्प यांनी असा अंदाज बांधला होता की कोरोना विषाणूमुळे अमेरिकेतील ६० हजार लोकांचा मृत्यू होईल. आता ट्रम्प यांनी रविवारी एका मुलाखतीत सांगितलं की, आम्ही ७५-८० हजार ते एक लाख लोकांना गमावू शकतो. हे इतकं भयानक आहे. व्हाईट हाऊस एक महिना बंद झाल्यानंतर जवळजवळ महिनाभरानंतर ट्रम्प मेरीलँडमधील अध्यक्षीय छावणी कॅम्प डेव्हिडला परतले आणि लिंकन मेमोरियलमध्ये रविवारी रात्री फॉक्स न्यूज चॅनेलच्या टाउनहॉलमध्ये हजेरी लावली.

- Advertisement -

हेही वाचा – मोदी सरकारच्या आर्थिक चुका दाखवण्यात काँग्रेसला अपयश; पृथ्वीराज चव्हाणांचा खुलासा


अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आम्ही योग्य कार्य केलं आहे आणि माझा खरोखर विश्वास आहे की आम्ही लाखो लोकांचे प्राण वाचवले आहेत. अमेरिकेत मृतांचा आकडा ६९ हजार ९२१ वर पोहोचला आहे आणि १२ लाख १२ हजार ८३५ लोक संक्रमित आहेत. तर आतापर्यंत १ लाख ८८ हजार ०२७ जण बरे झाले आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -