मुसळधार पावासाने दिल्ली जलमय

मुसळधार पावासाने दिल्ली जलमय

मुंबईत मुसळधार पाऊस

राजधानी दिल्लीमध्ये शनिवारी सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे दिल्लीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे दिल्लीतील अनेक भागामध्ये पाणी साचले आहे. रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूकिचा मोठा खोळंबा झाला आहे. हवामान खात्याने पुढच्या दोन दिवस दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे.

बस पाण्यामध्ये अडकली

यमुना बाजार परिसरातील हनुमान मंदिर येथे पाणी साचल्याने त्याठिकाणावरुन जाणारी बस पाण्यात अडकली. या बसमधून जाणाऱ्या ३१ प्रवाशांची अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सुटका केली आहे.

रहिवासी वस्ती आणि बाजारपेठमध्ये पाणी

दिल्लीच्या रहिवासी वस्ती, बाजारपेठेमध्ये पाणी साचले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागामध्ये वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. दिल्लीच्या आईटीओ, कश्मीरी गेट बस आगार, मोरी गेट, मजनू टीला, कनॉट प्लेस, मिंटो रोड, वसंत कुंज, आरके पुरम, करोल बाग, जखीरा भागामध्ये पाणी साचले आहे. यमुनापारच्या अनेक भागामध्ये देखील हळूहळू पाणी साचायला सुरुवात झाली आहे. तर नागरिकांच्या घरामध्ये आणि बाजारपेठेमध्ये पाणी शिरल्याने घरांचे आणि बाजारपेठेचे मोठे नुकसान झाले आहे. चांदनी चौक परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानातील सामान पाण्यासोबत वाहून गेले.

दोन दिवसात मुसळधार पावसाचा इशारा

येत्या दोन दिवसामुळे दिल्लीमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हरियाणा, दिल्ली आणि चंदीगडमध्ये ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रस्त्यांवर साचलेले पाणी काढण्यासाठी अग्निशमन दालाच्य कर्मचाऱ्यांनी पंप लावले आहेत.

First Published on: September 1, 2018 3:55 PM
Exit mobile version