‘एक पॅग रोज, दूर रहेंगे रोग’ महिलेने दारू दुकानाबाहेरच दिल्या हेल्थ टिप्स

‘एक पॅग रोज, दूर रहेंगे रोग’ महिलेने दारू दुकानाबाहेरच दिल्या हेल्थ टिप्स

'एक पॅग रोज, दूर रहेंगे रोग' महिलेने दारू दुकानाबाहेरच दिल्या हेल्थ टिप्स

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये नाईट कर्फ्यू आणि लॉकडाऊन लावण्यात येत आहे. दिल्लीत कोरोनाला थोपविण्यासाठी केजरीवाल सरकारने ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. आज रात्री १० वाजल्यापासून लॉकडाऊनला सुरुवात होणार असून पुढच्या आठवड्यातील सोमवारी ५ वाजल्यापर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. दरम्यान दिल्लीत जशी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली तशी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. अनेक ठिकाणी दारुच्या दुकानांवर तळीरामांनी प्रचंड गर्दी केली. याच गर्दीमध्ये एक महिला दारू घेण्यासाठी पोहोचली. त्यानंतर तिने केलेल्या दाव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिल्लीतील गीता कॉलनी भागातील दारुच्या दुकानावरील गर्दीत असलेल्या त्या महिलेने सांगितले की, ‘ती दारू घेण्यासाठी आली आहे. यामध्ये अल्कोहोल असल्यामुळे ते फायदेशीर असेल. इंजेक्शन फायद्याचे नाही, अल्कोहोल फायद्याचे आहे. जितेक लोकं दारू पितील, तितकेच लोकं सुरक्षित राहतील. आमच्यावर औषधांचा काहीही फरक पडत नाही, फक्त एका पॅगने फरक पडेल. मी ३५ वर्षांपासून दारू पित आहे. मी कधीही डोस वैगेर घेतले नाहीत. आम्ही हेच घेतो. एक पॅग रोज आणि यामध्ये आमचा डोस असतो.’

दिल्लीत जाहीर केलेल्या लॉकडाऊनबाबत महिला बोलली की, ‘दारुचे दुकान उघडे ठेवले पाहिजे, आम्ही रुग्णालयात जाण्यापासून वाचू आणि पुढे देखील वाचू.’ सध्या या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.


हेही वाचा – Video: हळदीला DJच्या तालावर बैलांसह वऱ्हाड्यांचे धुमशान, कोरोनाचे नियम मोडल्याने नवरदेवावर


 

First Published on: April 19, 2021 6:21 PM
Exit mobile version