Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग Video: हळदीला DJच्या तालावर बैलांसह वऱ्हाड्यांचे धुमशान, कोरोनाचे नियम मोडल्याने नवरदेवावर...

Video: हळदीला DJच्या तालावर बैलांसह वऱ्हाड्यांचे धुमशान, कोरोनाचे नियम मोडल्याने नवरदेवावर कारवाई

जमलेल्या लोकांवर आणि बैलांवर पैशांचा पाऊस

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यंदाही ऐन लग्नसराईत कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लग्नसमारंभ पुढे ढकलले आहेत. कल्याणमध्ये मात्र कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून धुमधडाक्यात लग्न सोहळा पार पडत आहे. बाहेर कोरोनाचे थैमान सुरु असताना कल्याण पूर्व येथील चिचापाडा येथे मुलाच्या लग्नासाठी मोठा घाट घातला गेला. हळदीच्या दिवशी नवरदेवासह वऱ्हाडी मंडळींमध्ये हळदीचे धुमशान पहायला मिळाली. हळदीत बैलही नाचवण्यात आले. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नवरदेव आणि त्याच्या वडिलांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. सध्या या हळदीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

- Advertisement -

मुलाच्या लग्नासाठी कल्याणमध्ये मोठी तयारी करण्यात आली होती. लग्नासाठी मोठा मंडप सजवण्यात आला होता. विशेष म्हणजे हळदीच्या दिवशी मंडपात दोन बैलांना देखिल आणण्यात आले होते. बैलांनाही हळदीत नाचवण्यात आले. हळदीत जमलेल्या एकाही वऱ्हाड्याने मास्क परिधान केला नव्हता. कोरोनोच्या सर्व नियमांचे उल्लंघन करण्यात आले. हळदीत DJच्या गाण्यांवर धुमशान घालण्यात आले. मंडपात सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ता फज्जा उडवण्यात आला. त्याचप्रमाणे जमलेल्या लोकांवर आणि बैलांवर पैशांचा पाऊसच पाडण्यात आला.

कल्याण मधील हा संपूर्ण प्रकार लज्जास्पद आहे. कोरोनामुळे एकीकडे लोकांना मृत्यूचा सामना करावा लागतो आहे तर एकीकडे प्रशासनाला मदत करण्याऐवजी लोक नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत.


- Advertisement -

हेही वाचा – Google Mapने घातला घोळ,वऱ्हाड्यांसह नवरदेव पोहचला दुसऱ्याच लग्नमंडपात

- Advertisement -