दिल्ली निर्भया प्रकरण: दोषी पवन गुप्ताचा राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज

दिल्ली निर्भया प्रकरण: दोषी पवन गुप्ताचा राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज

दिल्ली निर्भया प्रकरण: दोषी पवन गुप्ताचा राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज

आज सर्वोच्च न्यायालयाने निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी पवन गुप्ताची क्युरेटिव्ह याचिका फेटाळली. त्यामुळे निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना उद्या फासावर लटकवण्याची शक्यता आहे. तसंच आता पटियाला न्यायालयाकडून जारी केलेल्या नवीन डेथ वॉरंट थांबवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मात्र या निकालानंतर पवनने पुन्हा एकदा राष्ट्रपती दया याचिका केली आहे, असं पवन गुप्ताचे वकील ए.पी सिंग यांनी सांगितलं आहे. त्यामुळे या दयेच्या अर्जावर काही सुनावणी होते का? किंवा राष्ट्रपती काय निर्णय घेतात याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

सकाळी १०.२५ वाजता पवन याचिकेवर न्यायमूर्ती एन. व्ही. रमन्ना, न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती रोहिंग्टन फली नरीमन, न्यायमूर्ती आर. भानुमती आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठा समोर सुनावणी सुरू झाली होती. मुकेश कुमार सिंह (वय ३२), पवन गुप्ता (वय २५), विनय कुमार शर्मा (वय २६) आणि अक्षय कुमार (वय ३१) अशी या प्रकरणातील दोषींची नावं आहेत. सर्वोच्च न्यायालयाने पवन गुप्ताची क्युरेटिव्ह याचिका फेटाळल्यामुळे उद्या या चारही दोषींना फाशी देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा – दिल्ली निर्भया प्रकरण: उद्या चारही दोषींना फासावर लटकवणार?


 

First Published on: March 2, 2020 1:35 PM
Exit mobile version