Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी दिल्ली निर्भया प्रकरण: उद्या चारही दोषींना फासावर लटकवणार?

दिल्ली निर्भया प्रकरण: उद्या चारही दोषींना फासावर लटकवणार?

Subscribe

आज निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी पवन गुप्ता याने दाखल केलेली क्युरेटिव्ह याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना उद्या फासावर लटकवण्याची शक्यता आहे. सकाळी १०.२५ वाजता पवन याचिकेवर न्यायमूर्ती एन. व्ही. रमन्ना, न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती रोहिंग्टन फली नरीमन, न्यायमूर्ती आर. भानुमती आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठा समोर सुनावणी सुरू झाली होती. पटियाला न्यायालयाकडून जारी केलेल्या नवीन डेथ वॉरंट थांबवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने सभागृहात विचार करून हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं आहे. दोषी पवन गुप्ताची मंगळवारी होणाऱ्या फाशीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. यापूर्वी अन्य तीन दोषी अक्षय, विनय, मुकेश यांनी क्युरेटिव्ह आणि राष्ट्रपती दया याचिका केली होती. मात्र यांची ही याचिका फेटाळून लावली होती. मात्र आता दोषी पवनला पुन्हा एकदा राष्ट्रपती दया याचिका करण्याचा मार्ग आहे.

- Advertisement -

 

१७ फेब्रुवारीला पटियाला न्यायालयाकडून नवीन डेथ वॉरंट जारी करण्यात आलं होत. त्यानुसार या चारही नराधमांना ३ मार्चला सकाळी ६ वाजता फासावर लटकवणार आहेत. २९ फेब्रुवारीला दोषी अक्षयने पाटियाला न्यायालयात पुन्हा एकदा याचिक केली होती. मात्र त्यावेळेस तुरुंग प्राधिकरणाने दोषी पवन सोडून इतर तीन जणांचे याचिक करण्याचे पर्याय संपले असल्याचं सांगितलं.


- Advertisement -

हेही वाचा – दिल्ली हिंसाचार: नाल्यात सापडले मृतदेह; मृतांचा आकडा ४६ वर


 

- Advertisment -