ओरडा चुकवण्यासाठी कुटुबीयांचा केला खून

ओरडा चुकवण्यासाठी कुटुबीयांचा केला खून

प्रातिनिधिक फोटो

आई-वडिल आणि बहिणीच्या ओरड्याला कंटाळून एका तरुणाने त्यांचा खून केल्याची घटना नवी दिल्लीत समोर आली आहे. पश्चिम दिल्लीतील किशनगड परिसरात ही घटना घडली. घटनेनंतर १९ वर्षीय आरोपी तरुणाला अटक करण्यात आले आहे. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याने आरोप मान्य केला आहे. घरचे अभ्यासासाठी ओरडत असल्यामुळे त्याने घरच्यांचा खून केला असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. वारंवार चाकूने भोसकून निघृणपणे हत्या करण्याची ही दुसरी घटना आहे. या अगोदर दिल्लीत एका तरुणाने आपल्याच वडिलांची हत्या केली होती. क्रिकेटमध्ये पैसे गमावल्यानंतर मदत करण्यास नकार दिल्यामुळे वडिलांचा खून करण्यात आला होता. दिल्लीतील वाढत्या घटनांमुळे या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हत्या करुन दोन तास मृतदेहाजवळ बसला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज (१९) असे या अटक तरुणाचे नाव आहे. बुधवारी रात्री तीनच्या सुमारास त्याने आपले वडिल मिथलेश वर्मा (४४) यांच्या छातीत आणि पोटावर चाकूचे वार केले. त्यानंतर आई सिया (३८) आणि अल्पवयीन बहिणीवर चाकूने वार केले. हत्या केल्यानंतर त्यांच्या मृतदेहांजवळ सूरज दोन तास बसून राहिला. सकाळी साडे पाचच्या सुमारास परिसरात राहाणाऱ्यांना त्याने घरी बोलावले. घरात चोरी झाली असून चोरांनी आपल्या कुटुंबीयांना मारले असल्याचे त्याने लोकांना सांगितले. मात्र त्याने सांगितलेल्या घटनेवर पोलिसांना संक्षय आला. पोलिसांनी अधिक तपास केला असता मुलानेच आपल्या कुटुंबीयाचा खून केला असल्याची माहिती समोर आली.

पोलिसांना चखमा देण्याचा प्रयत्न

पोलिसांना चखमा देण्यासाठी त्याने स्वःताच्या शरीरावरही चाकूचे वार केले. चोरांना मृत असल्याचे भासवल्यामुळे चोरांनी त्याला मारले नाही असे त्याने पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितले. मात्र पोलीसांनी इंगा दाखवल्यानंतर त्याने हकीकत सांगितली. काही वर्षापूर्वी सूरजने स्वतःच्या अपहरणाचे नाटक केले होते यानंतर वडिलांनी त्याला बेदम मारहाण केली होती. या घटनेनंतर घरच्यांकडून सूरजला चांगली वागणूक मिळत नव्हती. इंजिनिअरिंगमध्ये शिकत असताना त्याने पहिला आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्याने आपल्या कुटुंबीयांचीच हत्या केली.

First Published on: October 11, 2018 7:22 PM
Exit mobile version