दिल्ली हिंसाचार: गुप्तचराच्या हत्येप्रकरणी नगरसेवकावर गुन्हा दाखल; आपने केलं निलंबित

दिल्ली हिंसाचार: गुप्तचराच्या हत्येप्रकरणी नगरसेवकावर गुन्हा दाखल; आपने केलं निलंबित

आपचे नगरसेवक ताहिर हुसेन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

आपचे नगरसेवक ताहिर हुसेन यांच्याविरोधात दिल्ली हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. आपने ताहिर हुसेन यांना निलंबित केलं आहे. याविषयी आपने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून  माहिती दिली आहे. नगरसेवक ताहिर हुसेन यांची दिल्ली हिंसाचाराच्या प्रकरणातील चौकशी होईपर्यंत आम आदमी पार्टीमधून त्यांना निलंबित केलं आहे, असं आपने ट्विट केलं आहे. गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी अंकित शर्मा यांची हत्या केल्याचा आरोप ताहिर हुसेन यांच्यावर केला आहे. अंकित शर्मा यांच्या वडिलांच्या तक्रारीनुसार ताहिर यांच्यावर भारतीय दंड संहितेनुसार कलम ३६५ आणि ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. अंकित शर्मा यांच्या हत्या प्रकरणी दयालपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी ताहिर यांच्या घरावर जप्ती आणण्यात आली आहे. ताहिर हुसेन यांच्यावर दिल्ली हिंसाचार भडकवण्याचा आरोप आहे. तसंच दिल्ली हिंसाचारात हत्या झालेल्या गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी अंकित शर्मा यांच्या कुटुंबियांनी ताहिर यांच्यावर खून केल्याचा आरोप केला आहे. याशिवाय २५ फेब्रुवारीला चांदबाग येथील लोकांवर दगडफेक आणि पेट्रोल बॉम्ब फेकल्याचा आरोप देखील ताहिर यांच्यावर आहे. ताहिर यांनी या आरोपाला नाकारले आहे. मात्र आता एक व्हिडिओ उघडकीस आला आहे. ज्यामध्ये ताहिर यांच्या घरावरती दगड आणि पेट्रोल बॉम्ब सापडले आहेत.

सध्या ताहिर घरामध्ये नाही आहेत. यापूर्वी ताहिर यांच्या घराच्या छतावरून दगड आणि पेट्रोल बॉम्ब फेकण्याचा व्हिडिओ समोर आला होता. मात्र ताहिर यांनी या घटनेच्या दरम्यान घरी नसल्याचं सांगितलं. तसंच त्यांना बदनाम करण्याचा हा कट असल्याचं त्यांनी सांगितलं होत.


हेही वाचा – दिल्ली हिंसाचार: गुप्तचर अधिकारी अंकित शर्मा यांची हत्या; नाल्यात आढळला मृतदेह


 

First Published on: February 28, 2020 8:39 AM
Exit mobile version