Ram Rahim Singh: पंजाब निवडणुकीच्या तोंडावर राम रहीमची २१ दिवसांची सुट्टी मंजूर

Ram Rahim Singh: पंजाब निवडणुकीच्या तोंडावर राम रहीमची २१ दिवसांची सुट्टी मंजूर

Ram Rahim Singh: पंजाब निवडणुकीच्या तोंडावर राम रहीमची २१ दिवसांची सुट्टी मंजूर

पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीपूर्वी ऑगस्ट २०१७पासून सुनारिया जेलमध्ये असलेल्या गुरमीत राम रहीमला २१ दिवसांची सुट्टी सरकारने मंजूर केली आहे. राम रहीम गुरुग्रामच्या डेरा येथे पोलिसांच्या देखरेखीखाली असणार आहे. त्यामुळे आता राम रहीम गुरुगावकडे रवाना झाला आहे. त्याचा ताफा सुनारिया जेलमधून निघाला आहे. पोलिसांच्या देखरेखीखाली राम रहीमला जेलमधून गुरुग्राम डेराकडे नेले जात आहे. कायदे व्यवस्थेबाबत पोलीस अधीक्षक उदय सिंह मीना यांनी पोलिस अधिकाऱ्यांची तीन दौऱ्याची बैठक घेतली आहे.

१०० जवान ८ तासांची शिफ्ट करणार

राम रहीम गुरुग्राम येण्याची सूचना मिळाल्यानंतर साउथ सिटी-दोन स्थित असलेल्या आश्रमच्या बाहेर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. राम रहीमच्या सुरक्षेत ३०० हून अधिक जवान तैनात होणार आहेत. १०० जवान ८ तासांची शिफ्टमध्ये काम करतील.

२१ दिवसांसाठी राम राहणार गुरुग्राममध्ये

माहितीनुसार, गुरमीत राम रहीम २१ दिवसांच्या सुट्टीत गुरुग्राममध्ये राहिल. आज सायंकाळी ४ वाजल्यानंतर मोठ्या सुरक्षेत त्याला गुरुग्रामच्या साउथ सिटीमधील डेरावर आणले जाईल. यासाठी संयुक्त पोलीस आयुक्त, डीसीपी ईस्ट, एसीपी यांनी डेराचा तपास केला आहे.

डेराच्या बाहेर क्विक रिस्पॉन्स टीम तैनात राहणार

संपूर्ण वेळ डेराच्या बाहेर क्विक रिस्पॉन्स टीम (QRT) तैनात राहणार आहे. राम रहीमच्या सुरक्षेबाबत पोलीस आयुक्त आणि संयुक्त पोलीस आयुक्तांच्या बैठकीनंतर हा कार्यक्रम जारी केला जाईल. २०१७पासून जेव्हा राम रहीम जेलमध्ये बंद आहे, तेव्हापासून पहिल्यांदाच त्याला २१ दिवसांची सुट्टी मंजूर केली आहे. दरम्यान आईला भेटण्यासाठी यापूर्वी १२ तासांच्या पेरोलवर राम रहीम गुरुग्राममध्ये होता.


हेही वाचा – UP CM योगी आदित्यनाथांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलीस यंत्रणाकडून तपास सुरु


 

First Published on: February 7, 2022 5:00 PM
Exit mobile version