पंतप्रधान मोदी आणि इस्त्राईलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्यात कोरोना लस बनवण्यावर चर्चा

पंतप्रधान मोदी आणि इस्त्राईलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्यात कोरोना लस बनवण्यावर चर्चा

कोरोनोच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. या चर्चेत दोन्ही दोन्ही देशांनी कोरोनावर एकत्र लस विकसित करण्यावर जोर दिला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंजामिन नेतान्याहू पंतप्रधान झआल्याबद्दल अभिनंदन केलं. बेंजामिन नेतान्याहू हे पाचव्यांदा इस्त्राईलचे पंतप्रधान झाले आहेत.

मोदींनी ट्वीट करून म्हटलं आहे की, “मित्र पंतप्रधान नेतान्याहू यांच्याशी चर्चा केली. कोरोनाच्या उद्रेकानंतर आम्ही जगासाठी सहकार्य वाढविण्याचा विचार केला. आगामी काळात भारत आणि इस्त्राईलचे सहकार्य आणखी बळकट होईल.” दरम्यान, त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की दोन्ही देशांमधील सहकार्य वाढवण्यावर विचार केला. सहकार्याच्या क्षेत्रात, कोविड-१९ वर संशोधन आणि लस विकसित करण्याचं मुख्य लक्ष्य असेल. याव्यतिरिक्त, कृषी संशोधन, आरोग्य तंत्रज्ञान, संरक्षण क्षेत्र आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यास सहमती दर्शविली आहे. दोन्ही नेत्यांनी लवकरात लवकर चर्चा करून संबंध आणखी मजबूत करण्यावर भर दिला.

कोरोना महामारीवर कंबोडियाच्या पंतप्रधानांशी चर्चा

पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार पंतप्रधान मोदींनी बुधवारी कंबोडियाचे पंतप्रधान ह्युन सेन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी कोरोना विषाणूच्या साथीवर चर्चा केली. एकमेकांच्या नागरिकांच्या प्रवासाला मदत करण्यासाठी आणि त्यांचे निर्गम सुलभ करण्यासाठी सहकार्य सुरू ठेवण्यास दोघांनी सहमती दर्शविली.


हेही वाचा – …तर पुन:श्च लॉकडाऊन होईल


 

First Published on: June 11, 2020 8:19 AM
Exit mobile version