धक्कादायक! मूत्राशयात सापडली मोबाइल चार्जची केबल!

धक्कादायक! मूत्राशयात सापडली मोबाइल चार्जची केबल!

आसाममधील रुग्णालयात सगळ्यांना हैराण करणारी घटना घडली आहे. या घटनेमुळे डॉक्टर देखील आश्चर्यचकीत झाले आहेत. काही आठवड्यांपूर्वी आसाम मधील ३० वर्षीय तरुण ओटीपोटात दुखत असल्यामुळे डॉक्टरांकडे आला होता. त्याने चुकून हेडफोनची तार गिळ्याचे डॉक्टरांना सांगितले. ती तार काढण्यासाठी डॉक्टरांनी त्याचे ऑपरेशन करण्याचे ठरविले.

दरम्यान त्याचे ऑपरेशन करत असताना डॉक्टरांना असे काही आढळले जे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. खरंतर आसाममधील तरुणाने डॉक्टरांना सांगितले होते की, हेडफोनची सुमारे २ इंच लांबीची तार गिळ्यानंतर त्याला पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे सुरुवातील डॉक्टरांनी मलाची तपासणी करून एन्डोस्कोपीही केली. पण त्याचा पोटात हेडफोनची तार सापडली नाही. यानंतर डॉक्टरांनी त्या तरुणावर ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. परंतु जेव्हा डॉक्टरांनी त्याची शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांना कळाले की हा तरुण खोटे बोलत आहे.

गुवाहाटी येथील सुप्रसिद्ध सर्जन डॉ. इस्लाम यांनी या रुग्णाचे ऑपरेशन केले. ते म्हणाले की, ‘जेव्हा आम्ही ऑपरेशन केले तेव्हा या तरुणाच्या पोटात आम्हाला काही नाही.’ मग त्यानंतर या तरुणाचे एक्स-रे केले. या एक्स-रेमध्ये मोबाइल केबल प्रत्यक्षात त्या तरुणाच्या पोटात नसून त्याच्या मूत्राशयात असल्याचे आढळले. डॉक्टर इस्लाम म्हणाले की, ‘मी जवळजवळ २५ वर्षांपासून ऑपरेशन करीत आहे पण माझ्या समोरची ही पहिली घटना आहे. पुढे ते म्हणाले की, या तरुणाने प्रत्यक्षात तोंडातून नव्हे तर मूत्रामार्ग मोबाइल चार्जरची केबल शरीरात टाकली होती.’


हेही वाचा – मास्क न घातल्यामुळे पोलिसाने तोंडावर गुडघा ठेऊन मारहाण; नेटकऱ्यांनी केली जॉर्ज फ्लॉइडच्या घटनेशी तुलना


 

First Published on: June 6, 2020 12:43 AM
Exit mobile version