अरे बापरे! ‘तिच्या’ किडनीमध्ये ३००० स्टोन?

अरे बापरे! ‘तिच्या’ किडनीमध्ये ३००० स्टोन?

चीनमधील महिलेच्या किडनीमधून काढले ३००० स्टोन

मुतखडा ( किडनी स्टोन ) झाल्यानंतर होणाऱ्या वेदना जीवन नकोसे करून सोडतात. अगदी साध्या भाषेत सांगायचे झाले तर स्टोनचा प्रॉब्लेम नको रे बाबा! त्यावर ऑपरेशन हाच शेवटचा उपाय! किडनीमध्ये जास्तीस जास्त किती स्टोन सापडतील? एक? दोन? सात? पण तुम्हाला कुणी सांगितले की किडनीमध्ये तब्बल ३ हजार स्टोन सापडले! तर, तुमचा विश्वास बसेल? चीनमधील झीआन्सु प्रांतातील एका ५६ वर्षीय महिलेच्या किडनीमधून तब्बल ३ हजार स्टोन बाहेर काढण्यात आले आहेत. पाठदुखीचा त्रास होत असल्याचे या महिलेने डॉक्टरांना सांगितले. त्यानंतर जे दिसले त्याने डॉक्टरांचे डोळे देखील चक्रावून गेले. डॉक्टरांनी ऑपरेशन करत तब्बल ३ हजार किडनी स्टोन बाहेर काढले. ऑपरेशननंतर या महिलेची तब्येत व्यवस्थित आहे. ऑपरेशन नंतर महिलेच्या किडनीतून बाहेर काढलेले स्टोन मोजायला चक्क तासाभराचा अवधी लागला. या महिलेच्या किडनीमधून तब्बल २९८० स्टोन बाहेर काढण्यात आले. यापूर्वी महाराष्ट्रातील एका रूग्णाच्या शरीरातून तब्बल १,७२,१५५ स्टोन बाहेर काढण्यात आले होते.

 

वाचा मुतखड्याचा त्रास आहे? तर ‘हे’ नक्की वाचा

वाचा – किडनी स्टोनवर घरगुती उपाय

First Published on: July 26, 2018 12:40 PM
Exit mobile version