ऑगस्टमध्ये देशांतर्गत हवाई वाहतुकीत ३१ टक्क्यांची वाढ – ICRA

ऑगस्टमध्ये देशांतर्गत हवाई वाहतुकीत ३१ टक्क्यांची वाढ – ICRA

गेल्या महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत हवाई प्रवासी वाहतूकीत वाढ झाली आहे. ही वाढ ३१ टक्क्यांनी वाढून ६६ लाख झाली आहे, अशी माहिती क्रेडिट रेटिंग एजन्सी आयसीआरएने सोमवारी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे. गेल्यावर्षी २०२० च्या ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत प्रवासी वाहतूक ५१ लाख होती. ऑगस्टमध्ये दरवर्षी देशांतर्गत प्रवासी वाहतूक २.८३ मिलियन प्रवाशांसह साधारण १३१ टक्क्यांनी वाढली. ICRA च्या मते, गेल्या महिन्यात सुधारणा झाल्यानंतरही, सध्या मागणीत कमतरता आहे, मुख्यतः कोविड महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे लोक आवश्यक असतानाच प्रवास करत आहेत.

हवाई प्रवासाची मागणी वाढत असून ऑगस्टमध्ये साधारण ३० ते ३१ टक्क्यांनी वाढ झाली असून ६५ ते ६६ लाख झाली आहे, तर जुलै २०२१ मध्ये हा अंदाज साधारण ५०.१ लाख रुपये असून जे १३१ टक्क्यांची वार्षिक वाढ दर्शवते. ऑगस्ट २०२१ मध्ये एअरलाइनची कॅपेसिटी डिप्लॉइमेंट सुमारे ९९ टक्के जास्त होती, जी ऑगस्ट २०२० मध्ये २८ हजार ८३४ फ्लाइट्स डिपार्चर तुलनेत अंदाजे ५७ हजार ५०० फ्लाइट्स डिपार्चर होते, असे ICRA च्या प्रमुखांनी सांगितले. नागरी उड्डयन मंत्रालयाने २५ मे पासून देशांतर्गत मार्गांवर कॅपासिटी डिप्लॉइमेंट ३३ टक्क्यांपर्यंत हळूहळू वाढ करण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान, कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे, परमिसिबल कॅपासिटी डिप्लॉइमेंट ५० टक्क्यांनी कमी करण्यात आले होते.

५ जुलै रोजी परवानगी दिलेली क्षमता पुन्हा ६५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली, जी नंतर यावर्षी १२ ऑगस्टपासून ७५.२ टक्के करण्यात आली. याशिवाय मंत्रालयाने १२ ऑगस्ट २०२१ ते ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत देशांतर्गत उड्डाणांसाठी किमान आणि कमाल भाड्यात १० ते १३ टक्के वाढ करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सध्या प्रवास केवळ अत्यावश्यक कारणांसाठी केला जात आहे. त्यामुळे भाडेवाढीमुळे प्रवासी वाहतुकीच्या मागणीवर फारसा परिणाम होणार नसल्याचे ICRA चे म्हणणे आहे. यामुळे विमान कंपन्यांसाठी जेट इंधनाच्या किंमतीतील वाढीचा काही भाग भरून निघेल आणि यामुळे विमान कंपन्यांचे नुकसानही कमी होईल.


तिसऱ्या लाटेचा फटका कोणत्या राज्यांना बसू शकतो ? ICMR चे स्पष्टीकरण

First Published on: September 7, 2021 3:29 PM
Exit mobile version