खवय्यांसाठी बॅड न्यूज; मंदीमुळे डोमिनॉज पिझ्झा होणार बंद

खवय्यांसाठी बॅड न्यूज; मंदीमुळे डोमिनॉज पिझ्झा होणार बंद

मंदीमुळे डोमिनॉज पिझ्झा होणार बंद

पिझ्झा अगदी चवीने खाणाऱ्या खवय्यांसाठी बॅड न्यूज आहे. जागतिक आर्थिकमंदीची झळ आता पिझ्झाला ही बसली आहे. त्यामुळे, काही देशांमध्ये डोमिनॉज पिझ्झा बंद होणार आहे. ब्रिटनमधील कंपनी तोट्यात असल्याने पिझ्झाचं उत्पादन केलं जाणार नसल्याचे समोर आले आहे. खूप भूक लागली की तात्काळ हल्ली पिझ्झा ऑर्डर केला जातो. कमी वेळात पिझ्झाची घरगुती डिलीव्हरी देखील केली जाते. पण, आता हाच पिझ्झा बंद होणार आहे. जगातील चार देशातून ही सेवा बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

यासाठी घेण्यात आला निर्णय

ब्रिटनची सर्वात मोठी पिझ्झा डिलीव्हरी कंपनीने गुरूवारी ही माहिती दिली. कंपनीला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागल्याने चार देशातील व्यापार थांबवण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. डोमिनॉजच्या या निर्णयामुळे त्यांच्या लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. न्यूज एजन्सी रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, ज्या देशात डोमिनॉज पिझ्झाची सेवा तोट्यात सुरू आहे. त्या ठिकाणी आकर्षक बाजाराचे प्रतिनिधीत्व आम्ही करू शकलो नाही. त्या ठिकाणी आम्ही आमची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती डोमिनॉजचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेविड वाइल्ड यांनी दिली आहे.

या चार देशांतील पिझ्झा होणार बंद

डोमिनॉजची सेवा चार देशात बंद होणार आहे. पण यात भारताचा समावेश नाही. त्यामुळे, भारतीयांना याविषयी चिंता करण्याची गरज नसल्याचं ही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. स्वीत्झर्लंड, आईस्लँड, नॉर्वे आणि स्वीडन या चार देशातून ही सेवा बंद करण्यात येणार आहे.


हेही वाचा – काय सांगता? पुणेकरांना न्याहारीसाठी पोहे नको पिझ्झा हवा!


 

First Published on: October 17, 2019 7:14 PM
Exit mobile version