घरमहाराष्ट्रकाय सांगता? पुणेकरांना न्याहारीसाठी पोहे नको पिझ्झा हवा!

काय सांगता? पुणेकरांना न्याहारीसाठी पोहे नको पिझ्झा हवा!

Subscribe

पुणेकर त्यांच्या खाद्यपदार्थांबद्दल चोखंदळ असल्याचं आजपर्यंत ऐकिवात होतं. पण आता पुणेकरांना पारंपरिक न्याहारीचे पदार्थ अर्थात पोहे, उपमाऐवजी पिझ्झा आणि नूडल्स आवडायला लागल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे!

पुणेकर म्हटलं की एक विशिष्ट सिस्टीम सेट झालेली असते, असं म्हणतात. मग ती त्यांच्या दिवसाच्या वेळापत्रकाबद्दल असो, त्यांच्या आहाराबद्दल असो किंवा मग त्यांच्या एकंदरीत लाइफस्टाइलबद्दल असो. पुणेकरांच्या न्याहारीबद्दलच बोलायचं झालं, तर पोहे, मिसळ, उपमा, शिरा आणि नुकताच या लिस्टमध्ये अॅड झालेला साऊथ इंडियन डोसा-उथप्पा हे पुणेकरांचे फेव्हरेट. पण आता असं लक्षात आलंय, की या पदार्थांना पुणेकर नकार देत आहेत. आणि चक्क पिझ्झा आणि इन्स्टंट नूडल्सला पसंती देऊ लागले आहेत. आणि हे नुसतंच विधान नसून एका सर्वेमधून ही बाब समोर आली आहे!

सहकुटुंब देतात पिझ्झाला पसंती!

यमलेन या फूड चेन कंपनीने याबाबत नुकताच पुण्यात सर्व्हे केला. आणि त्या सर्व्हेचे निष्कर्ष सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारे होते. कारण चक्क पुणेकरांनी पोहे-उपम्याला नकार देत न्याहारीसाठी पिझ्झा-नूडल्सला पसंती दिली होती. पुण्यासोबतच बंगळुरू, मुंबई अशा मोठ्या शहरांमध्ये हा सर्व्हे घेण्यात आला. सर्व्हेच्या निष्कर्षांनुसार साधारणपणे ३५ ते ४४ वयोगटातले पुणेकर बहुतांश वेळा सकाळचा ब्रेकफास्ट अर्थात न्याहारीसाठी पिझ्झाला पसंती देतात. विशेष म्हणजे यातले तब्बल ८३ टक्के पुणेकर हे विवाहित असून त्यांना मुले देखील आहेत. त्यामुळे हे पुणेकर फक्त स्वत:च नाहीत, तर सहकुटुंब पिझ्झाला पसंती देतात.

- Advertisement -

पारंपरिक पदार्थांना फाटा

या सर्वेक्षणातील निरीक्षणांबद्दल बोलताना यमलेनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हितेश आहुजा म्हणाले, “भारतीय लोक आपल्या पारंपरिक न्याहारीच्या पदार्थांपासून झपाट्याने दूर जात आहेत आणि नवनवीन पदार्थांची चव घेत आहेत. कामाचा वाढता दाब, बदलती जीवनशैली आणि नवनवीन पदार्थांची चव घेण्याचे खुलेपण यामुळे हा बदल दिसून येत आहे.”


हेही वाचा – ब्रेकफास्ट’ला सुट्टी दिली तर?

सोयीस्कर खाद्यपदार्थांची मागणी वाढली!

सध्याच्या गतिशील जीवनात आरोग्यदायक आणि सोयीस्कर खाद्यपदार्थांची मागणी वाढत आहे. एकंदर पारंपरिक आणि अपारंपरिक खाद्यपदार्थ उद्योगातील एक मोठा भाग असलेले ‘रेडी टू इट’ फूड मार्केट हे २०१८ ते २०२३ च्या दरम्यान २१.८% इतक्या वार्षिक वृद्धीदराने वाढेल असा अंदाज आहे. मात्र त्यातही पुणेकरांनी अशा प्रकारे पारंपरिक न्याहारीच्या पदार्थांना फाटा देत पिझ्झाला पसंती देणं हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -