डॉन मुन्ना बजरंगीची कारागृहातच हत्या

डॉन मुन्ना बजरंगीची कारागृहातच हत्या

कुख्यात गुंड मुन्ना बजरंगी

अंडरवर्ल्ड डॉन मुन्ना बजरंगी म्हणजेच प्रेम प्रकाश सिंह याची कारागृहात गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. उत्तरप्रदेशच्या बागपत जिल्ह्यातील कारागृहात ही हत्या झाली असून या हत्येनंतर जिल्ह्यात खळबळ माजली. सोमवारी मुन्नाला कोर्टात हजर करण्यापूर्वी त्याची हत्या करण्यात आली. याप्रकरणी कारागृह अधिकाऱ्यांसह तुरुंगातील चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून या संदर्भातला अधिक तपास आता पोलीस करत आहेत. मुन्ना बजरंगीची हत्या हा कट होता त्यामुळे त्याच्या हत्येबद्दल आणि कारागृहातील सुरक्षेविषयी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

सुनील राठीवर संशय 

मुन्ना बजरंगीच्या हत्येमागे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधल्या सुनील राठी यांच्या शूटरचा हात असल्याचा संशय मुन्ना बजरंगीची बायको सीमा सिंहने व्यक्त केला आहे. त्यामुळे त्या दृष्टिने पोलीस अधिक तपास करत आहेत. सीमा उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार होती. एका खटल्याशी निगडीत मुन्ना बजरंगी यांची सुनावणी सोमवारी होती. त्या आधीच त्याची हत्या झाली. रविवारी रात्री बजरंगीला झाशीच्या कारागृहातून बागपत कारागृहात हलवण्यात आले होते. सोमवारी बागपत रेल्वेशी निगडीत एका खटल्याची सुनावणी होती. म्हणूनच त्यांना रविवारी रात्री ९ वाजता बागपत कारागृहात हलवले होते. त्या दरम्यानच हा सगळा प्रकार झाला.

हत्येचा कट रचल्याचा आधीच संशय

मुन्ना बजरंगीच्या जीवाला धोका असल्याचा संशय तिच्या बायकोने आधीच व्यक्त केला होता. २९ जूनला झालेल्या एका पत्रकार परीषदेत सीम सिंहने पतीला धोका असल्याचे सांगितले होते. कुख्यात गुंड असून अनेक मोठ्या गुन्ह्यात त्याचा समावेश होता.

कोण आहे सुनील राठी?

उत्तराखंड भागात सुनीलची दहशत आहे. येथील अनेक कुकर्मात त्याचा हात आहे. सुनील राठीच नाही तर त्याचे संपूर्ण कुटुंब गुन्हेगारी पार्श्वभूमीशी निगडीत आहे. खंडणीसाठी तो प्रसिद्ध होता. एका डॉक्टराकडून ५ लाख खंडणी मागितल्याप्रकरणी तो पोलिसांच्या ताब्यात आहे. उत्तराखंडमधल्या रुडकी कारागृहात तो होता. तेथे जिवाला धोका सांगून त्याने स्वत:ची बदली बागपत कारागृहातून केली होती.

कुख्यात गुंड सुनील राठी (पांढऱ्या कपड्यात)
First Published on: July 9, 2018 11:58 AM
Exit mobile version