डोनाल्ड ट्रम्प यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा माजी मॉडेलचा आरोप

डोनाल्ड ट्रम्प यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा माजी मॉडेलचा आरोप

डोनाल्ड ट्रम्प यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा माजी मॉडेलचा आरोप

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. ट्रम्प यांच्यावर माजी मॉडेलने एक धक्कादायक आरोप केला आहे. माजी मॉडेल Amy Dorrisने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लैंगिक अत्याचार आणि शोषण केल्याचा आरोप केला आहे. २३ वर्षांपूर्वी ट्रम्प यांनी Amy Dorris हिच्यासोबत ओपन टेनिस स्पर्धेदरम्यान जबरदस्ती केली होती. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. ३ नोव्हेंबरला होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकी पूर्वी ट्रम्प यांची प्रतिमा खराब करण्यासाठी हे आरोप लावण्यात आले आहेत, असा दावा ट्रम्प यांच्या वकिलाने केला आहे.

Amy Dorrisने ‘द गार्डियन’ला दिलेल्या मुलाखतीत हा खळबळजनक आरोप केला आहे. या मुलाखतीत ती म्हणाली की, ‘त्यावेळेस माझा मित्र जेसन बिन याने माझी ओळख ट्रम्प यांच्याशी केली. ओपन टेनिस स्पर्धेदरम्यान ट्रम्प यांनी व्हीआयपी बॉक्समधील बाथरुममध्ये मला पकडले आणि जबरदस्तीने किस केली. यावेळी मी ट्रम्पना हटवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी मला अजून घट्ट पकडले.’

ट्रम्प यांच्या वकिलाने हा आरोप फेटाळून लावला असून ते म्हणाले की, ‘राष्ट्राध्यक्षांची प्रतिमा खराब करण्याचे हे एक षडयंत्र आहे. राष्ट्राध्यक्षांनी कधी चुकीच्या पद्धतीने व्यवहार केला नाही. जर असे झाले असते तर व्हीआयपी बॉक्समधील लोकांनी हे पाहिले असते.’ दरम्यान Amy Dorrisचा बॉयफ्रेंड जेसन बिनने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आहे.


हेही वाचा – तर इराणवर करू मोठा हल्ला, ट्रम्प यांची धमकी


 

First Published on: September 18, 2020 8:24 AM
Exit mobile version