कर्नाटकमधील ऐतिहासिक विजय; ठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

कर्नाटकमधील ऐतिहासिक विजय; ठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

ठाणे | कर्नाटकमध्ये काँग्रेसला मिळत असलेल्या ऐतिहासिक प्रतिसादमुळे ठाणे काँग्रेसच्या वतीने आज दुपारी ठाणे काँग्रेस कार्यालयाबाहेर एकच जल्लोष केला. यावेळी ढोल ताशांचा गजर करत फटाके फोडून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. यावेळी ठाणे काँग्रेस (जिल्हा)शहराध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण, शहर काँग्रेस प्रवक्ते सचिन शिंदे, महिला अध्यक्षा वैशाली भोसले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

यावेळी शहराध्यक्ष चव्हाण यांनी बोलताना सांगितले, की भाजपा सरकारने आपल्या सत्तेचा गैरवापर करून कर्नाटकातील काँग्रेस व विरोधी पक्षनेत्यांवर सुडबुद्धीने विविध कारवाई केल्या. त्यामुळे कर्नाटक जनतेने त्यांना त्याची खरी जागा दाखवून दिली. पंतप्रधान फक्त ‘मन की बात’ करीत राहीले, ‘जन की बात’ मात्र करीत नव्हते. परंतु काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कायम जनतेमध्ये जाऊन ‘जन की बात’ ऐकत होते त्याचे प्रश्न समजावून घेत होते,भाजपा करित असलेले जातीयवादी विचार कर्नाटक जनतेने उधळून लावले व सर्व धर्म समभाव चा नारा देणाऱ्या काँग्रेसला साथ दिली असे शेवटी सांगितले.

कर्नाटक विजयानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया

राहुल गांधी म्हणाले, “हा कर्नाटकमधील जनतेचा विजय आहे. कर्नाटकमधील कॉंग्रेसचे नेते, कार्यकर्ते आणि कॉंग्रेसला मदत करणाऱ्या सर्वांचा हा विजय आहे. या विजयासाठी मी कर्नाटकमधील जनता आणि सर्वांचे मी आभार मानतो. या सर्वांचे मी अभिनंदन करतो. या निकालाने दाखवून दिले की या देशातील जनतेला द्वेषाचे राजकारण आवडत नाही. इस देश को मोहब्बत अच्छी लगती है. अब नफरत की बाजार बंद हुई और महोब्बत की दुकान शुरू हो गई है.”

हेही वाचा – Congress Win : राहुल गांधी म्हणाले – कर्नाटक में नफरत का बाजार बंद, मोहब्बत की दुकानें खुलीं

कर्नाटकात काँग्रेसचा विजय

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालात कॉंग्रेस आघाडीवर आहे. आतापर्यंत कॉंग्रेसचे ५० उमेदवार विजयी झाले आहेत. तर कॉंग्रेसचे ८७ उमेदवार आघाडीवर आहेत. भाजपचे २१ उमेदवार विजयी झाले असून ४२ उमेदवार आघाडीवर आहेत. कॉंग्रेसच्या संभाव्य विजयावर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली.

First Published on: May 13, 2023 4:14 PM
Exit mobile version